सध्या भाज्यापाल्यांचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना (farmers) दिलासा मिळत आहे. पुढील काळात सणांमुळे मिरचीला अधिक मागणी असणार आहे, यावेळी देखील मिरचीला चांगला भाव मिळून हिरव्या मिरचीच्या दरात चांगली सुधारणा होऊ शकते. तुरीच्या दरातही चांगली वाढ होणार आहे.
पुणे आणि मुंबई या बाजार समित्यांमध्ये (market committees) सध्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार रुपये दर मिळतोय. तर कांदा दर अजूनही स्थिर आहेत. राज्यातील महत्वाच्या लासलगाव, मालेगाव, पिंपळगाव, येवला, पुणे आणि मुंबई या बाजार समित्यांमध्ये कांदा आवक अधिक होतेय.
शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; पीक विम्यासाठी 187 कोटी मंजूर
सध्या उन्हाळ, पांढरा आणि लाल कांदा (onion) बाजारात येतोय. आवकेचा दबाव असल्यानं दर दबावात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. राज्यात सध्या कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ७०० रुपये ते १४०० रुपये दर मिळतोय. तर कमाल दर १८०० रुपयांपर्यंत मिळाला.
एक ते दीड महिन्यानंतर बाजारात कांदा (Onion market) आवक कमी होऊन दर सुधारू शकतात. त्यामुळं सध्याच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांपर्यंत सुधारणा होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
आता महावितरण ठेवणार नजर; नुकसान भरून काढण्यासाठी राबविली जाणार 'ही' मोहीम
तुरीचे दर वाढण्याची शक्यता
सध्या तुरीच्या दरातील (Tur Rate) तेजी कमी झाली आहे. सध्या देशात तुरीची उपलब्धता खूपच कमी आहे. बाजार समित्यांमधील आवकही (Tur Arrival) घटली आहे. सध्या देशात केवळ ६ लाख टन तुरीचा साठा (Tur Stock) उपलब्ध आहे.
बाजारातील परिस्थिती पाहता तुरीच्या नवीन मालाला 11 हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतात, असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे. सध्या तुरीला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर पुढील महिनाभरात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुरीच्या दरात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास मिळणार 20 लाख रुपये
खरीप पिकांमध्ये आंतरमशागतीचे नियोजन करा तंत्र पद्धतीने; चांगल्या उत्पादनासाठी होणार मदत
दिवसाला फक्त 45 रुपये वाचवून 25 लाखांचे मालक व्हा; एलआयसीची 'जीवन आनंद योजना' देत आहे संधी
Share your comments