Chilli Market News : नंदुरबारमधील मिरचीचे व्यवहार पुन्हा सुरु झाले आहेत. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे मिरचीचे व्यवहार ठप्प करण्यात आले होते. सोमवारपासून बाजार समिती सुरु झाल्याने मिरची व्यवहार सुरु झाले आहेत. सध्या बाजार समितीत मिरची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने दर कमी मिळत आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मात्र मिरचीला अपेक्षित दर नसल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
दराअभावी शेतकरी नाराज
उत्तर भारतातील थंडीचा परिणाम राज्यातील थंडीवर देखील झाला होता. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याने मिरचीचे व्यवहार ठप्प करण्यात आले होते. सोमवारपासून आता व्यवहार सुरळीत झाल्याने बाजार मिरचीची आवक सुरु झाली आहे. मिरचीला दोन हजार पासून ते चार हजारपर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी अशी आवक होत आहे. जोडून आलेल्या तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बाजार समिती आता पुन्हा सुरु झाल्याने बाजारात जवळपास ३०० ते ३५० वाहनांतून मिरचीची आवक झाली. बाजार समितीमध्ये आतापर्यंत २ लाख २५ हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे.
नंदुरबार बाजार समिती मिरचीसाठी प्रसिद्ध
देशातील सर्वांत मोठी मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समिती प्रसिद्ध आहे. त्यामुळे मिरची उत्पादक मिरची विक्रीसाठी पहिली पसंदी नंदुरबारला देतात. पण आता बाजार समितीत मिरची आवक वाढल्याने दरात नरमाई आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे.
ढगाळ वातावरणामुळे बाजार समिती बंद होती. आता वातावरण निवळल्याने बाजार समिती सुरु झाली आहे. त्यामुळे बाजार मिरचीची आवक वाढली असल्याने दर नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यंदा मिरची उत्पादनासाठी केलेला खर्च निघणे देखील मुश्किल असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसंच पुढील दीड ते दोन महिने बाजार समितीत मिरची आवक कायम राहिली, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात येत आहे.
Share your comments