आपण पाहिले की कोरोना काळात अनेक जणांचा रोजगार गेला. मोठ्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे अक्षरश उपासमारीची वेळ देखील आली. परंतु त्यामध्ये एक आशेचा किरण आहे तो म्हणजे जर तुम्हाला शेती विषयी थोडीफार माहिती असेल तर आपण या समस्येपासून स्वतःचा बचाव चांगल्या पद्धतीने करू शकतात.
कारण की या लेखामध्ये आपण अश्या एका व्यवसाय विषयी माहिती येणार आहोत ज्यामध्ये तुम्ही चांगला नफा मिळू शकतात. यासाठी तुमच्याकडे अंगण किंवा घराचे छत म्हणजेच घर हे स्लॅबचे असायला हवे.यालाच टेरेस फार्मिंग असे म्हणतात. सध्या टेरेस फार्मिंग हे खूप ट्रेडिंगमध्ये असून या माध्यमातून आपण चांगला पैसा कमवू शकतात. यामध्ये मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकतत्वे पाण्याच्या साहाय्याने म्हणजेच हायड्रोपोनिक पद्धतीने दिली जातात.टेरेस फर्मिंग हा व्यवसाय खूप लाभकारक आहे. त्यामध्ये आपण दोन मित्रांचे उदाहरण घेणार आहोत. त्यांचे नाव आहे कौस्तुभ खरे आणि साहिल पारिखयांची खेतीफाई नावाची कंपनी फक्त 19 हजार रुपयांमध्ये 200 वर्ग मीटर छतावर शेती बनवून सातशे किलो ग्राम भाजीपाला उत्पादित करतआहेत.
विना माती आणि कमी पाण्यातील शेती
या दोघांनी असे मॉडेल तयार केले होते की यामध्ये मातीची गरज नसते शिवाय पाणी पण कमी लागते. यासाठी त्यांनी टेरेसवर शेती करण्यासाठी कॅरी बनवले आहे व ती वॉटरप्रूफ आहे. या वाफ्यामध्ये त्यांनी भेंडी, टोमॅटो, वांगे,मेथी, पालक आणि मिरचीचे उत्पादन घेतात. टेरेस फार्मिंग खाण्यासाठी नारळाच्या कसण्याची गरज असते. घरावर अधिक वजन पडू नये म्हणून मातीचा उपयोग केला जात नाही. या फार्मिंग साठी नारळाच्या सालीऐवजीकाही मिश्रणनही टाकले जाते.यामुळे पिके लवकर मोठे होत असतात आणि जमिनीचा आकार कमी कमी होत असल्याने याकॅरीला म्हणजे बेडला मोठी मागणी वाढणार आहे. चार फूट बाय चार फूट चार केरिया लावल्यानंतर एका परिवारासाठी आपण महिन्याभराचा भाजीपाला उगवू शकतो. दिवसेंदिवस कमी होत असलेले शेतीचे क्षेत्र आणि सेंद्रीय अन्नपदार्थां विषयांचा ओढा यामुळे अर्बन फार्मिंग मध्ये नव्या पद्धतीचे मागणी वाढली आहे.
मागणी वाढल्याने व्यापारी आणि शहरी शेतकरी छत किंवा पार्किंगच्या जागेत शेती फुलवत आहेत. या पद्धतीत मातीची गरज नसते. मातीची गरज नसल्याने छोट्या जागेत ही पद्धत यशस्वी होते. एक लाख रुपये खर्च करून आपण दोन लाख रुपयांचा भाजीपाला त्यामध्ये उत्पादित करू शकतो. या शेतीच्या पद्धतीला हायड्रोपोनिक्स म्हटले जाते. या पद्धतीने पाण्याच्या साहाय्याने झाडांना पोषकतत्वे दिली जातात. झाडे मल्टी लियर फ्रेमच्या मदतीने टिके पाइपने उगवले जातात आणि त्यातून पोषक तत्त्वे झाडांना दिले जातात.
Share your comments