जर आपण एकंदरीत भारताचा विचार केला तर सीताफळाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. खास करून महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर औरंगाबाद, जळगाव, परभणी, अहमदनगर, नासिक, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिताफळ लागवड केली जाते.
या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे अवर्षणप्रवण भागात आणि अगदी हलक्या जमिनीत देखील हे पीक चांगले येते. आपल्याला माहित आहेच की,
कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी दर्जेदार बियाणे अथवा जात खूप महत्त्वाची असते. अगदी हीच बाब सीताफळाच्या बाबतीत देखील लागू होते. त्यामुळे या लेखात आपण सीताफळाच्या चार दर्जेदार आणि चांगल्या उत्पादनक्षम जातींची माहिती घेणार आहोत.
सीताफळाच्या चार चांगल्या उत्पादनक्षम जाती
1-अर्का सहान- ही संकरित जात असून या जातीची फळे तुलनेने गुळगुळीत आणि गोड असतात. अर्का सहान ही सिताफळाची संकरित जात आहे. या जातीची फळे खूप रसाळ आणि खूप हळूहळू पिकणारी असतात. तसेच यामध्ये बियाण्याचे प्रमाण कमी व आकाराने लहान असते. एवढेच नाही तर या जातीच्या सीताफळाचा आतील गर बर्फासारख्या पांढरा दिसतो.
2- लाल सीताफळ- या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे लाल रंगाची असून प्रति झाड प्रति वर्ष सरासरी 40 ते 50 फळे देते. त्यासोबतच या जातीची शुद्धता बियाणे उगवल्यानंतर बऱ्याच प्रमाणात टिकते.
3-मॅमथ- या जातीपासून सीताफळाचे उत्पादन हे लाल सिताफळा पेक्षा जास्त मिळते. ही जात प्रतिझाड प्रतिवर्ष सुमारे 60 ते 80 फळे देते. लाल सीताफळाच्या तुलनेत या जातीच्या फळांमध्ये बियांची संख्या कमी असते. या जातीचे उत्पादन व गुणवत्तेच्या दृष्टीने उत्तम आहे.
4- बालानगर- ही जात झारखंड प्रदेशासाठी योग्य असून या जातीची फळे हलक्या हिरव्या रंगाचे असतात. या जातीच्या फळाच्या आतील भागांमध्ये बियांची संख्या जास्त प्रमाणात असते. या जातीचे एक झाड सुमारे पाच किलो फळे देते.
याशिवाय वाशिंग्टन पीआय 107,005 ब्रिटिश गयाना आणि बार्बाडोस यासारख्या देखील चांगल्या जाती आहेत.
नक्की वाचा:Silk Farming! आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी रेशीम शेती आहे फायदेशीर,मिळतो योजनेचा लाभ
Share your comments