महाराष्ट्रामध्ये आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन एनए-10 व एनए-7 या जातींची शिफारस आहे. जमिनीचा पोत व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आवळ्यामध्ये आंतरपिके घ्यावीत.
आवळा हे भारतीय उपखंडातील सर्वात महत्त्वाचे औषधी व आरोग्यवर्धक फळ आहे. आवळा फळ क जीवनसत्व व टॅनिनचासमृद्ध स्त्रोत आहे. फळांमध्ये सरासरी 100 ग्रॅम मध्ये 700 मिलिग्रॅम अस्कोब्रिकअँसिड आणि लोह, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.
- सुधारित जाती:
महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी कृष्णा, कांचन, एनए -10 व एनए-7या जातींची शिफारस आहे. राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये एनए-10या जातीची लागवड यशस्वीरीत्या केली जाते.
- बनारसी:- फळांचे वजन 40-45 ग्रॅम, साखरेचे प्रमाण 12.5 % आम्लता 1.5% फळांच्या 100 ग्रॅमखाण्यायोग्य भागात 650 मिलिग्रॅमक जीवनसत्त्वअसतात.
उत्पादन35-38 किलो प्रति झाड
- कृष्णा :- (एन.ए-5)
फळांचे वजन 30-40 ग्रॅम, साखरेचे प्रमाण 11.5 टक्के,आम्लता 1.4 टक्के,100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 475 मिलिग्रॅम क जीवनसत्व असते.
- चकैया :- फळांचे वजन 30-32 ग्रॅम, फळांच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात पाचशे मिलिग्रॅम क जीवनसत्व असते. उत्पादन 30 किलो प्रति झाड
- कांचन:-( एन.ए-4)
फळांचे वजन 30-32 ग्रॅम, साखरेचे प्रमाण 10 %, आम्लता 1.45 % फळांच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 500 मिलिग्रॅम क जीवनसत्व असते.
- आनंद -1 :- फळांचे वजन 35 ग्रॅम, जीवनसत्व क 770 मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅम असते उत्पादन 17- 80 किलो प्रति झाड
- आनंद -2 :-फळाचे वजन 45 ग्रॅम असते जीवनसत्व क चे प्रमाण 100 ग्रॅम ला 775 मिलिग्रॅम असते उत्पादन 100 ते 125 किलो प्रति झाड
- बी. एस.आर. -1 :- फळांचे सरासरी वजन 27 ते 30 ग्रॅम फळांमध्ये साखरेचे प्रमाण110 % जीवनसत्व क चे प्रमाण 100 ग्रॅम ला 620 मिलिग्रॅम उत्पादन 40 - 45 किलो प्रति झाड.
- बलवंत (एन.ए.-10):- फळांचे वजन 40 ग्रॅम साखरेचे प्रमाण 9.90%आम्लता 2.17% जीवनसत्व क चे प्रमाण 100 ग्रॅम ला 528 मिलिग्रॅम असते. उत्पादन 42 किलो प्रति झाड.
Share your comments