1. फलोत्पादन

द्राक्ष बागेला लागणाऱ्या तीन प्रमुख रोगांवर हेक्सास्टॉपने घाला आळा

भारतात जवळपास सर्वत्र द्राक्षे पिकाची शेती केली जाऊ शकते. द्राक्षांमध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आढळतात आणि इतर कारणांमुळे द्राक्ष शेतीची महत्वता दिवसागणिक वाढतच जाते आहे. जर द्राक्ष उत्पादनाचा विचार केला तर द्राक्ष उत्पादनात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे प्रमुख राज्य अव्वल येतात. तसेच उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली हे राज्य शिर्शस्थानी आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
द्राक्ष बागेला लागणाऱ्या तीन प्रमुख रोगांवर हेक्सास्टॉपने घाला आळा

द्राक्ष बागेला लागणाऱ्या तीन प्रमुख रोगांवर हेक्सास्टॉपने घाला आळा

 भारतात  जवळपास सर्वत्र द्राक्षे पिकाची शेती केली जाऊ शकते. द्राक्षांमध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आढळतात आणि इतर कारणांमुळे द्राक्ष शेतीची महत्वता दिवसागणिक वाढतच जाते आहे.  जर द्राक्ष उत्पादनाचा विचार केला तर द्राक्ष उत्पादनात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे प्रमुख राज्य अव्वल येतात. तसेच उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली हे राज्य शिर्शस्थानी आहेत.

द्राक्ष शेतीसाठी उष्ण आणि कोरड्या वातावरणाची आवश्यकता असते.  मोठ्या संख्येने शेतकरी ड्रीप इरिगेशनचा वापर द्राक्ष शेतीसाठी करतात.  शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, ज्याप्रकारे द्राक्ष लागवड करताना तूम्ही द्राक्षची उन्नत जात,  इरिगेशन, जमिनीची मशागत या बाबींवर लक्ष घालण्याची गरज आहे, त्याप्रमाणेच द्राक्षेला लागणाऱ्या रोगांवरदेखील तेवढ्याच बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे. आज आम्ही द्राक्षला लागणारे रोग आणि त्यावरील उपचार ह्या सर्व बाबींची सविस्तर माहिती देणार आहोत.

द्राक्ष पिकाला लागणारे प्रमुख रोग

  • Anthracnose(एन्थ्रेक्नोज)-

  • द्राक्षाला लागणाऱ्या प्रमुख रोगांपैकी हा एक रोग आहे. जो प्रामुख्याने पत्तीवर्ती व कळीवर हल्ला करतो. हा रोग पानांरती छोटे छोटे- छिद्रे बनवतो आणि पानांचे क्षेत्र कमी करतो.
  • Powdery mildew (पाऊडरी बुरशी)-

  • हा सर्वात जास्त हानिकारक रोग आहे. ह्या रोगामुळे पिकांचे सर्वात जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच ताजे द्राक्ष निर्यात करण्याच्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा आहे. जे द्राक्षचा घढ ह्या रोगाने संक्रमित होतात, त्या पानांवर डाग पडतात आणि ती पान कमकुवत व विकृत बनतात. हा रोग उष्ण आणि कोरड्या वातावरणात तयार होतो. या रोगाची ओळख म्हणजे पान, कळी व अपरिपक्व फळांच्या दोन्ही बाजूला सफेद पावडरची कोटींग.
  • Rust (जंग रोग)-

 

  • ह्या रोगाच्या प्रकोपामुळे पानावरती पिवळ्या रंगाचे छोटे-छोटे डाग किनाऱ्यालगत बनतात. कधी-कधी हे डाग पानांच्या देठावरती पण आढळतात.

रोगांचे नियंत्रण व उपचार

या रोगांच्या नियंत्रणासाठी हेक्सास्टॉप पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. हे रोगांवर नियंत्रण मिळवण्यात व त्यावर उपचार करण्यात खूपच रामबाण आहे.  याशिवाय रोपांवर येणाऱ्या बुर्शिलाही नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.  हे मानव, पक्षी व स्तनदा प्राण्यांसाठी सुरक्षित आहे.   

हेक्सास्टॉपची प्रमुख वैशिष्ट्य

  • हे खुप साऱ्या रोगांना नियंत्रित करते.

  • हे बुरशीनाशक झायलेम द्वारा झाडामध्ये संचारित होते.

  • याचा वापर बीज उपचार झाडामध्ये स्प्रे आणि झाडांच्या ड्रेचींगमध्ये देखील याचा उपयोग होतो.

  • हे सल्फर परमाणूमुळे फायटोटोनिक प्रभाव म्हणजेच झाडे हिरवीगार दाखवतो.

उपलब्धता(availability)

हेक्सास्टॉपची मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध आहे, ते सहा मात्रात उपलब्ध असते. जसे की,५०ग्राम,१००ग्राम,१५०ग्राम,२५० ग्राम,५००ग्राम,१kg,५kg. या प्रमाणात सहजरीत्या मिळते.

हेक्सास्टॉप औषधाचे प्रमाण

 द्राक्षसाठी एन्थ्रेक्नोज रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्सास्टॉप ३०० ग्राम/एकर एवढे प्रमाण घ्यायला हवं.

English Summary: The three major diseases affecting the vineyard Published on: 02 July 2021, 06:21 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters