महाराष्ट्रात कलिंगडाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.अंदाजे महाराष्ट्रात 660 हेक्टर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली जाते. हे पीक उन्हाळी हंगामामध्ये बागायती पीक म्हणून देखील घेतले जाते.नदीच्या पात्रात देखील हे पीक उत्तम येते.
तसेच कलिंगड प्रक्रिया करून त्याचा रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. या लेखात आपण कलिंगडच्या काही चांगले उत्पादन देणाऱ्या जाती आणि कलिंगडा वरील रोग व त्याचे व्यवस्थापन याबद्दल जाणून घेऊ.
कलिंगडाचे चांगले उत्पादन देणारे वाण
- ज्योती-कलिंगडची ही संकरित जात असून फळे मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात. फळांचा रंग फिक्कट हिरवा असून त्यावर गडद हिरवे पट्टे असतात तसेच गडद गुलाबी व गोड अशी ही जात आहे. ही जात साठवणूक करण्यासाठी उत्तम मानले जाते.या जातीपासून सरासरी हेक्टरी 800 क्विंटल उत्पादन मिळते.
- अर्का माणिक- कलिंगडाच्या या जातीच्या फळांचा आकार हा अंडाकृती असतो.साल पातळ हिरव्या रंगाची असून त्यावर गडद हिरवे पट्टे असतात. या जातीच्या कलिंगड च्या फळाचे वजन सहा किलोपर्यंत असते. या जातीपासून हेक्टरी 600 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
- आशियाई यामा टू- कलिंगडची ही जपानी जात असून हिचा तयार होण्याचा कालावधी हा मध्यम आहे. या जातीच्या फळांचे सरासरी वजन सात ते आठ किलो असते. तसेच फळे फिक्कट हिरव्या रंगाचे व गडद लाल असते. कलिंगडच्या या जातीचा फळातील गर गडद गुलाबी व गोड असतो व गोड असतो.
- शुगर बेबी- कलिंगडची ही जात आपल्या महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे.या जातीचे फळे मध्यम आकाराची असतात तसेच फळांचे वजनचार ते पाच किलोपर्यंत असते.कलिंगडच्या या जातीच्या फळांचा रंग काळपट हिरवा असून गर लाल असतो. या जातीचे फळ अत्यंत गोड असतात तसेच आतील बिया खूपच लहान असतात.
- न्यू हॅम्पशायर- कलिंगडची ही जात लवकर येणारी आहे. या जातीचा आकार अंडाकृती असून याची साल पातळ हिरव्या रंगाची असते. सालीवर हिरवे पट्टे असून फळ गडद लाल रंगाचे व चवीला गोड असते.
- या जातींत शिवाय दुर्गापुर केसर,पुसा वेदांत या जाती देखील लागवडीस चांगल्या आहेत.
Share your comments