भारतामध्ये आंब्या नंतर केळीच्या लागवडीचा दुसरा क्रमांक असून केळीची लागवड बाराही महिने करतात.केळी उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा दरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने आणि विक्रीच्या दृष्टीने होणाऱ्या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. एकूण उत्पादनापैकी सुमारे पन्नास टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील एकूण 44 हजार हेक्टर क्षेत्र केळीचे लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे.
केळीच्या शेतीमध्ये लागवडीपासून ते तोडणीपर्यंत निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो.या निरनिराळ्या पद्धती वरकेळी पिकाची गुणवत्ता निर्भर असते आणि या पद्धती योग्य रीतीने अमलात आणल्या शेतकऱ्याला गुणवत्तापूर्ण व भरघोस उत्पादन मिळू शकते. या लेखात आपण या पद्धती जाणून घेणार आहोत.
- पिले काढणे:
नवीन रोपांची लागवड केल्यानंतर दोन तीन महिन्यांमध्ये पिले येण्यास सुरुवात होते.पील म्हणजे केळीच्या मारतो वृक्षाच्या भोवताली छोटी छोटी उगवलेली नवीन रोपटे होय. ही नवीन रोपटे सतत काढावी लागतात. त्यामुळे अन्नद्रव्याचे पोषण मुख्य झाडास पूर्णपणे मिळते व फळांची गुणवत्ता आणि उत्पादन चांगले मिळते.पिल काढणे साधारणतः 45 ते 50 दिवसांमध्ये एका वेळेस करावे.पिलचा आपण झाडाभोवती आच्छादन म्हणून वापर करू शकतो. एक ते तीन पिल चांगले निरोगी राखून ठेवावे जेणेकरून त्याचा उपयोग पुढच्या वर्षी मातृवृक्षाचा उपयोग करता येईल.
- मात्तृवृक्षाला भर देणे:
सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यानंतरच या कालावधीत झाडांना भर देणे अतिशय महत्वाचे असते. या पद्धतीमध्ये झाडांना आधार देण्यासाठी सरीमधील माती वापरावी.वापरण्यात येणारी माती आंतर मशागत तिने भुसभुशीत केलेली असावी.जेणेकरून भर देणे सोपे जाईल व जमिनीमध्ये हवा खेळती राहील. या पद्धतीमुळे झाडाची जमिनीमध्ये कट्टर धरून ठेवण्याची क्षमता वाढतेआणि वारा वादळापासून संरक्षण मिळते.
- झाडांची पाने काढणे:
या पद्धतीचा अवलंब बागेच्या आवश्यकतेनुसार करावे.या पद्धतीमध्ये झाडांची वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून टाकावीत.योग्य वाढ होण्यासाठी आणि उत्पादनासाठी एका जीवन चक्र मध्ये एका झाडाला 10 ते 15 पाने असणे आवश्यक आहे.
- फुल तोडणी:
ही पद्धत शक्यतो शेतकरी करत नाही. या पद्धतीमध्ये झाडांना घडटाकल्यानंतर प्रत्येक घडाच्या टोकाला असलेली फुले काढून टाकावी. फुलांची घड झाल्यानंतर काढल्यास फळांना इजा होण्याची आणि गुणवत्ता खा लवण्याची शक्यता जास्त असते.
- झाडाला आधार देणे:
विविध पद्धती मध्ये झाडांना आधार देणे ही एक महत्त्वाची पद्धत आहे. या पद्धतीमध्ये बांबूचा किंवा नायलॉन दोरीचा वापर करून झाडांना आधार देण्यात येतो.ही पद्धत शक्यतो झाडाने घड टाकल्यानंतर करावी. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे झाडांची वारा वादळाच्या स्थितीमध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि होणारे नुकसान टळते.
- नर फुलांची काढणी:
केळीच्या झाडाने घड टाकल्यानंतर योग्य वाटणाऱ्या आठ ते दहा फांद्या ठेवाव्यात आणि योग्य झालेल्या फण्या व घडाच्या टोकाशी असलेल्या नरफुल काढून टाकावे. जेणेकरून घडांची योग्य वाढ व्हावी.
- घडांना अन्नद्रव्येदेणे:
ही पद्धत भारतीय उद्यान विद्या संशोधन संस्था बंगलोर येथून विकसित झालेले आहे. ही सर्वात उत्तम पद्धत असून या पद्धतीचा फायदा केळीच्या घडाचे वजन दोन ते चार किलोने वाढण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये नत्र पालाश आणि गंधक व गायीच्या शेणाची कढीहे घडाच्या बांधून ठेवावीत. त्यामुळे या अन्नद्रव्यांचे पोषण घडभरणी साठी अत्यंत महत्वाचे ठरते. या पद्धतीमध्ये साडे सात ग्रॅम नत्र आणि साडे सात ग्रॅम पालाश हे 100 मिली पाण्यामध्ये मिश्रण तयार करावे. त्या मिश्रणामध्ये 500 ग्रॅम गाईचे ताजे शेण वापरावे.हे सर्व मिश्रण एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये घ्यावे आणि घडाच्या टोकाला सुतळी च्या दोरीच्या साह्याने घट्ट बांधावे.ही पद्धत झाडांना फळधारणा झाल्यानंतर दोन ते पाच दिवसांमध्ये करावी. यामुळे घडांचे व प्रत्येक फळांचा आकार वाढून वजनात वाढ होते.
- घडझाकणे:
विशेषतः आहे ही पद्धत निर्यात करणारे शेतकरी करतात.घड झाकण्याचा हेतू म्हणजे घडांचे थंडीपासून संरक्षण करणे.तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे आणि कीटकांपासून प्रतिबंध करणे हा होय.या पद्धतीमुळे फळांची गुणवत्ता टिकविण्यासाठी फार मदत होते. या पद्धतीमध्ये साधारणतः निळ्या रंगाची प्लास्टिक पिशवी घड झाकण्यासाठी वापरावी किंवा पारदर्शक सुद्धा वापरू शकता.
- खोडांची कापणी करणे:
ही पद्धत केळीचे घड तोडणीनंतर करतात. या पद्धतीचा हेतू असा की घड काढणीनंतर संपूर्ण झाड किंवा खोड एकदम न तोडता काही कालावधीच्या अंतराने थोडे-थोडे झाडाचा भाग कापतजावा. जेणेकरून नवीन आलेल्या पिललाकापलेल्या खोडापासून भरपूर अन्नद्रव्य मिळावेत व निरोगी पिललातयार व्हावे ते पिल येणाऱ्या वर्षीचे पिके घेण्यासवापरावे.
Share your comments