नैसर्गिकरित्या सीताफळ या फळाचा बहर जून महिन्यात असतो मात्र उन्हाळ्यात पाण्याची मुबलकता असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीला बहर धरलेला आहे. सध्याचा धरलेला बहराची काढणी ही जुलै - ऑगस्ट महिन्यात काढली जाते. सीताफळाला दर सुद्धा चांगला मिळाला आहे. सीताफळ हे हंगामी पीक आहे जे की पूर्वी हे पीक जंगलात आढळून आले होते. उत्पादनाच्या दृष्टीने सिताफळाकडे कधी पाहिले नाही मात्र योग्य लागवड केली की उत्पादनात वाढ ही ठरलेली आहे मात्र यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
उन्हाळी बहरातील सीताफळाला धोका कशाचा?
उन्हाळी हंगामातील सिताफळाची छाटणी ही पूर्ण झालेली आहे जे की बागांना यामुळे नवीन कोवळी फुटलेली आहे. परंतु या कोवळ्या फुटीवर मावा, फुलकिडे, तुडतुडे आशा रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या ज्या रसशोषक किडी आहेत त्या किडी पाने, कोवळ्या फांद्या तसेच कोवळ्या फळातून देखील रस शोषून घेतात. या किडींमुळे फुटीची व पानांची तर वाढ खुंटतेच मात्र सोबतच या फळाचा आकार सुद्धा वेडावाकडा होतो. फळांची व्यवस्थितपणे वाढ होत नाही ज्यामुळे याचा परिणाम त्याच्या उत्पादनावर होतो.
किडीपासून कसे करावे संरक्षण :-
सीताफळाच्या बागेतील झाडांची छाटणी झाली की लागलीच एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. एवढेच नव्हे तर झाडाच्या खोडापासून अडीच फुटावर १ किलो चुना, १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाण्यात मिसळून लावावे. ज्या नवीनच कोवळ्या फुटी असतात त्या फुटीवर मावा, फुलकिडे, तुततुडे सारखे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे तुम्ही प्रति लिटर पाण्यात डायमिथोएट 2 मिली, मॅन्कोझेब 2 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम याचे मिश्रण करून फवारावे.
छाटणी झालेल्या बागांमध्ये कोवळी फूट :-
उन्हाळ्याच्या तोंडावर ज्या बागेची छाटणी पूर्ण झाली आहे असे बागांना कोवळी फूट तयार झाली असून नवीन पालवी फुटलेली असेल. इथून पुढे जर बागेची जोपासना केली तर शेतकऱ्यांच्या पदरी मोठ्या प्रमाणात उत्पादन पडणार आहे. छाटणी झाली की जास्त धोका असतो जे की सिताफळ उत्पादकांनी या दरम्यान काळजी घेणे गरजेचे आहे. जर बागेवर किडीचा प्रादुर्भाव झाला की वेळेवर बंदोबस्त करणे हाच पर्याय आहे.
Share your comments