बदलत्या काळानुसार शेतीमध्ये अमूलाग्र बदल घडून येत आहेत. शेतकरी आता पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देत नकदी पिकांकडे तसेच औषधी वनस्पतीच्या लागवडीकडे वळत आहेत. आणि अशा पिकांची लागवड ही शेतकऱ्यांसाठी खुपच फायद्याची ठरत आहे. शेवगा हे देखील एक औषधी वनस्पती आहे शिवाय शेवगा हे एक प्रमुख भाजीपाला पिक देखील आहे.
त्यामुळे शेवगाच्या ह्या बहुगुणामुळे त्याला मोठ्या प्रमाणात भारतात बाजार देखील उपलब्ध आहे. म्हणुन शेवगा पिकाची शास्त्रीय पद्धतीने लागवड (Drumstick Farming) करून शेतकरी चांगली कमाई करू शकतात. आज आपण शेवगा पिक लागवडीचे (Drumstick Cultivation) नियोजन कसे करणार हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत चला तर मग जाणुन घेऊया शेवगा लागवडिविषयी.
शेवगा लागवड करण्याचं सर्वात मोठा फायदा म्हणजे ह्याची लागवड कमी जागेत केली जाऊ शकते शिवाय ह्याच्या लागवडीसाठीचा खर्च हा इतर फळबाग पिकांच्या तुलनेत कमी आहे आणि म्हणुन ह्यातून मिळणारे उत्पादन हे जास्त असते. शेवगा हे भाजीपाला म्हणुन वापरले जाते. महाराष्ट्रात शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यात येते, तसेच शेवग्याची पाने, मुळे, बिया इत्यादी गोष्टींची विक्री केली जाते. शेवगा एकवेळेस लागवड केल्यावर जवळपास 10 वर्षपर्यंत उत्पादन देण्यासाठी तयार असते.
शेवगा लागवडीतील महत्वपूर्ण गोष्टी
»शेवगा लागवड ही थंड हवेच्या प्रदेशात करणे टाळावे. शेवगा हा थंड हवामाणात वाढत नाही आणि जरी वाढ झाली तरी उत्पादनात घट घडून येते.
»शेवगा ह्या झाडावर फुल येण्यासाठी व चांगले परागिभवनसाठी तापमान 25 ते 30 डिग्री सेल्शिअस असावे लागते अशी माहिती शेवगा उत्पादक शेतकरी देतात.
»डीडी किसान ह्या कृषी वाहिनीनुसार, शेवगा पिकाची लागवड कोरड्या वाळूमिश्रित चिकणमाती असलेल्या जमिनीत किंवा वाळूमिश्रित सुपीक चिकण मातीमध्ये केल्यास उत्पादन अधिक होते.
»भारतात सर्व्या ठिकाणी शेवगा लागवड केली जाऊ शकते परंतु थंड हवामानाच्या प्रदेशात शेवगा लागवड करू नये. महाराष्ट्रात देखील ह्याची लागवड केली जाते.
»शेवगा पिकाची लागवड करण्याआधी शेवगाचे बियाने हे पाण्यात भिजवावे सुमारे तीन दिवस शेवगा बियाणे पाण्यात भिजवण्याचा सल्ला दिला जातो.
»ह्याची लागवड ही कोरड्या जमिनीत केली जाऊ शकते. शेवगा लागवड करण्यासाठी जमिनीला एक फूट चौडे आणि खोल कोरावे लागते आणि पेरणी/टोपनी केल्यानंतर त्यावर माती झाकावी लागते.
»शेवगा लागवड ही रोपे तयार करून तसेच बिया डायरेक्ट टोपून देखील करता येते. म्हणजेच आपण रोपवाटिकेत रोपे तयार करून तयार झालेली रोपे मुख्य शेतात लावू शकतात.
»शेवगा लागवडीसाठी लागवडीच्या पहिल्या टप्प्यात खाद्याची आवश्यकता असते व पाण्याची गरज लागते.
»आपण शेवग्याच्या 2 किलो बियाण्यामध्ये 2 हेक्टर क्षेत्रासाठी रोपे तयार करू शकतात.
»जवळपास एक हेक्टर क्षेत्रात 1500 ते 2000 शेवगा रोपांची लागवड केली जाऊ शकते.
Share your comments