MFOI 2024 Road Show
  1. फलोत्पादन

शेतात लिंबूवर्गीय फळझाडे आहेत! उन्हाळ्यात अशा पद्धतीने करा व्यवस्थापन, होईल भरपूर फायदा

देशातील फळझाडांच्या लागवडीमध्ये महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य म्हणून गणले जात आहे.कमी पावसाच्या अवर्षणग्रस्त क्षेत्रात व हलक्यार जमिनीत देखीलकाही फळझाडांची लागवड फायदेशीर होऊ शकते. फळपिकांच्या लागवडीनंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत झाडांची काळजी घेणे फार गरजेचे असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
citrus fruit

citrus fruit

देशातील फळझाडांच्या लागवडीमध्ये महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य म्हणून गणले जात आहे.कमी पावसाच्या अवर्षणग्रस्त क्षेत्रात व हलक्‍या जमिनीत देखीलकाही फळझाडांची लागवड फायदेशीर होऊ शकते. फळपिकांच्या लागवडीनंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत झाडांची काळजी घेणे फार गरजेचे असते.

उन्हाळी हंगामात तर फळबागांचे नियोजन जर चांगल्या प्रकारे केले नाही तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे या लेखात आपण लिंबूवर्गीय फळझाडांची  उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने व्यवस्थापन करावे, याबद्दल माहिती घेणार आहोत.

 लिंबूवर्गीय फळ झाडाचे व्यवस्थापन( मोसंबी व कागदी लिंबू)-

  • पाणी देणे- लिंबूवर्गीय फळझाडांना दुहेरी ओळ म्हणजेच डबल रिंग पद्धतीने पाणी द्यावे. उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी देताना शक्यतो रात्री द्यावे. ज्या ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता आहे,या ठिकाणी ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची सोय करावी.
  • आच्छादनाचा वापर करणे- प्लास्टिक कागद किंवा भुसा यांचा आच्छादन म्हणून वापर करावा.आच्छादनामुळे जमिनीत सतत ओलावा राहण्यास मदत होते.शिवाय गवताचा बंदोबस्त होऊन जमिनीची धूप थांबते.
  • केओलिनचा वापर करणे- सहा टक्के तीव्रतेच्या केओलीन ची फवारणी उन्हाळ्यात लिंबूवर्गीय फळे झाडांवर केली असता बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन फळबागांचे उन्हापासून संरक्षण होण्यास मदत होते.
  • उन्हाळ्यात कागदी लिंबाचे उत्पादन वाढवण्यासाठी जून महिन्यात 50 पीपीएम जिब्रेलिक एसिड, सप्टेंबर महिन्यात एक हजार पीपीएम सायकोसिलऑक्टोबर महिन्यात एक टक्का पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी.
  • उन्हाळ्यामध्ये मोसंबीच्या आंबे बहराची फळगळ कमी करण्यासाठी एन. ए.ए. ( नेपथ्यलिक ऍसिटिक ऍसिड ) या संजीवकाची दहा पीपीएम म्हणजेच दहा मिलीग्राम प्रति लिटर पाणी तीव्रतेची फळधारणेनंतर 15 ते 20 दिवसानंतर फवारणी करावी किंवा 1.5 ग्राम 2-4 डी किंवा जिब्रेलिक एसिड आणि 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि एक किलो युरिया यांचे 100 लिटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी.
  • पंधरा दिवसांनी परत दुसरी फवारणी करावी.
  • मोसंबी व कागदी लिंबू झाडाच्या खोडास जमिनीपासून तीन फूट उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. ( एक किलो मोरचुद+ एक किलो चुना+ दहा लिटर पाणी ) त्यामुळे उन्हाळ्यात खोडावर पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित होऊनझाडाचे उन्हापासून संरक्षण होईल.
  • उन्हाळ्यात पाण्याची फारच कमतरता असल्यास झाडे जगवण्यासाठी झाडांवरील फळांची संख्या कमी करावी तसेच अनावश्यक फांद्यांची छाटणी करावी.
  • बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण करावे.
  • लिंबूवर्गीय फळांची वेळोवेळी चाळणी करून बाष्पीभवन वेग कमी करावा.
English Summary: management of citrus fruit orchard in summer condition Published on: 15 November 2021, 11:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters