नागपूर म्हटले म्हणजे संत्रा डोळ्यासमोर येतो. असे असले तरी जागतिक स्तरावर व आपल्या देशाच्या इतर भागांच्या तुलनेत नागपूर संत्र्याची उत्पादकताही कमी आहे. त्यामुळे नागपुरीसंत्रा पिकाची एकरी उत्पादकता वाढावी म्हणून या भागातील शेतकरी इंडो इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत.
भारत आणि इस्राईल यांच्यामध्ये तंत्रज्ञान सहकार्याबाबत सामंजस्य करार झाला आहे. या माध्यमातून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सन 2010 व 2011 पासून नागपूर संत्रा ची उत्पादकता वाढावी म्हणून या तंत्रज्ञानाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे.
काय आहे हे तंत्रज्ञान?
या तंत्रज्ञानामध्ये प्रति हेक्टरी झाडांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येते. जर आपण पारंपरिक लागवडीचा विचार केला तरी यामध्ये दोन झाडातील अंतर सहा बाय सहा असे आहे परंतु या तंत्रज्ञानानुसार हेक्टरी झाडांची संख्या मध्ये वाढ करण्यात येते.
यामध्ये लागवड करताना दोन ओळींतील अंतर सहा मीटर तर दोन झाडांतील अंतर तीन मीटर अशी शिफारस करण्यात आली आहे. पारंपरिक लागवड पद्धतीत हेक्टरी 278 झाडे बसतात तर या तंत्रज्ञानानुसार 555 पर्यंत झाडे हेक्टरी लागतात.
या तंत्रज्ञानामुळे यांचे प्रमाण नियंत्रणात राहते. पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये पाटपाण्याने पाणी दिल्याने संत्र्याची झाडे व मुळे सतत पाण्याच्या संपर्कात राहिल्यामुळे फायटोपथोराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
परंतु इंडो इस्रायली तंत्रज्ञानामध्ये लागवडीची शिफारस ही गादीवाफ्यावरकरण्यात आली आहे. तसेच डबल लॅटरल आणि फर्टिगेशन इत्यादीचा शिफारशीत समावेश करण्यात आल्याने झाडांचा मुलांचा प्रत्यक्ष पाण्याची जास्त संपर्क नआल्याने फायटोप्थोरा चा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो.( संदर्भ - ॲग्रोवन )
Share your comments