भारत आंबा उत्पादनात अग्रेसर देश आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या कोकण किनारपट्टी भागात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. असे असले तरी जगातील उत्पादनाच्या निम्मे उत्पादन भारतात होते तरी जागतिक उत्पादनात भारताचा वाटा फक्त सहा टक्के आहे. जागतिक बाजारपेठेतील मागणीचा विचार केला तर निर्यातीस मोठा वाव असून निर्यातीसाठी गुणवत्तेचे फळ लागते. या लेखात आपण निर्यातक्षम आंब्यासाठी कोणत्या पायाभूत गुणवत्ता आवश्यक आहेत ते पाहू.
- भौतिक प्रमाण – यामध्ये आंब्याचा बाहेर रूप कसे आहे याचा समावेश असतो. आंबा पूर्ण परिपक्व असावा. तसेच तोकडक आणि खाणे योग्य असावा. आंब्यावर कुठल्याही प्रकारचे टिपके नसावे तसेच तो स्वच्छ असावा. तसेच त्यावर कोणत्याही प्रकारचे ओरखडे तसेच त्याला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नसावी. तसेच फळांवर कुठल्याही प्रकारच्या जीव जंतूंचा प्रादुर्भाव झालेला नसावा. तसेच बाहेरील उष्णतेपासून फळ मुक्त असावे. कोल्ड स्टोरेज मधून काढल्यानंतर आंब्यावर पाण्याचे थेंब नसावेत.फळाचे देट निरोगी असावे आणि फळ करपारोगापासून मुक्त असावे.तसेच निर्यातीसाठी असलेले फळ पूर्ण विकसित आणि पिकलेली असावे.
- आकार, वजन, रंग – निर्यात केल्या जाणाऱ्या आंब्याचा आकार तपासला जातो.त्यामुळे योग्य आकाराची व एकसारख्या आकाराचे फळे असावीत. निर्यातीसाठी केशर आंबा चा विचार केला तर 250 ग्रॅम त्याचे वजन असावे. आंबे निर्यात करताना आपण ते पेटी मधून पाठवतो त्यामुळे एक सारख्या आकाराची फळे पेटीतठेवावीत.आंबा निर्यातीसाठी रंग महत्त्वाचा घटक आहे. निर्यात केलेला आंबा ग्राहक आणि बाजारपेठेत पोहोचतो तेव्हा तो एक सारखे पिवळ्या रंगाचा असावा.
- रासायनिक प्रमाण- आंब्यावर किंवा झाडावर अनेक प्रकारची कीटकनाशके फवारणी करतात. त्यामुळे कीटकनाशकांचा अंश फळामध्ये येतो. असे कीटकनाशकांचे अवश्य किती व कोणत्या प्रमाणात असावेत याचे निकष आयात करणाऱ्या देशांनी निश्चित केले आहेत. त्या देशाच्या निकषांच्या अधीन राहूनच आपले फळ असले पाहिजे
- तसेच फळांमधील सर्व प्रकारची भारी तत्वे ही त्या देशाने निश्चित केल्यानुसार असावीत.
- निर्यातीसाठी महत्वाचे मुद्दे
- फळपेटी मध्ये भरताना ते एकसारखे असावे.प्रत्येक फळासारखे गुणवत्तेचे व दर्जाचे असावेतसेच एका पेटीत एका जातीची फळे असावी.
- निर्यात करताना आंबा ज्या देशात जाणार याचा त्या देशात सुरक्षित पोचायला पाहिजे अशा रीतीने त्याचे पॅकिंग करावे लागते.पेटीत करण्यात येणारे पॅकिंग ला बारीक सिद्रेअसावीत. त्यामुळे हवा खेळती राहते. पॅकिंग साठी वापरण्यात येणारे साहित्य स्वच्छ आणि चांगल्या गुणवत्तेचे असले पाहिजे.
- प्रत्येक पॅकिंगवर ओळख चिन्ह, फळाचे नाव आणि माहिती, उत्पादनाचे ठिकाण, वजन, पॅकिंग केल्याची तारीख आणि कोड नंबर असावा.
Share your comments