सिताफळाच्या पानात कोरीन आणी ॲनोनीन ही गुणकारी कीटकनाशके सुद्धा असतात. या झाडांमध्ये हायड्रोसायनिक आम्ल असल्यामुळे सीताफळाच्या झाडाला वाळवी कधीच लागत नाही. सीताफळाच्या झाडाची महत्त्वाचे गोष्ट म्हणजे शेळी, मेंढी किंवा इतर कोणतेही प्राणी ते या झाडाची पाने खात नसल्यामुळे संरक्षण न करता या फळझाडाची जोपासना करणे अतिशय सोयीचे व सोपे आहे.
हे फळ अत्यंत काटक, हलक्याव मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे आहे तसेच दुष्काळातही तग धरून टिकून राहते वातावरणातील बदल पाहता दिवसेंदिवस पर्जन्यमानात कमी जास्त बदल होत आहे परंतु या पर्जन्यमानाचा, वातावरणाचा सिताफळावर कुठलाही परिणाम होत नाही. सीताफळ या फळाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांमध्ये प्रमुख्याने करताना आपल्याला आजही दिसते.
तसेच महाराष्ट्रात बीड, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यात प्रामुख्याने लागवड आढळून येते मराठवाड्यातील धारूर, दौलताबाद, आंध्र प्रदेशातील बालाघाट, पुणे जिल्ह्यातील सासवड ही गावे सीताफळासाठी खूप प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात सीताफळाच्या लागवडीमध्ये वाढ झाली असून याचे मुख्य कारण म्हणजे या फळपिकासाठी अनुकूल हवामान महाराष्ट्रात असून महाराष्ट्र शासनाने या फळपिकांचा समावेश आता राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमातही केला आहे.
सिताफळासाठी लागणारे हवामान
सीताफळासाठी हवामान लक्षात घेता कोरडे, उष्ण हवामान सिताफळास मानवते. कुठल्याही परिस्थितीत तग धरून जिवंत राहणे हे या फळझाडाचे वैशिष्ट्य आहे. सीताफळास जास्त पाण्याची गरज असते, फळे येताना उबदार व कोरडे हवामान असल्यास फळांमध्ये गोडी चांगली येते मात्र दमट हवामानात वाढ चांगली होते कमी पावसाच्या प्रदेशात डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात झाडांची पानगळ होऊन झाले विश्रांती घेतात वसंत ऋतु सुरू झाल्यावर फूट ठेवून फुले येतात मात्र उन्हाळ्यात तापमान जास्त व हवा कोरडी असते यामुळे फळधारणा होत नाही फुले गळून पडतात पावसाळा सुरू झाल्यावर मात्र फुले येतात व नंतर चांगली फळधारणा फळेसुद्धा लागतात._
सीताफळाच्या लागवडीसाठी आवश्यक असणारी जमीन
शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्यावेळी करावी? सीताफळ या पिकासाठी हलकी ते मध्यम सांगली निचरा होणारी २ ते ३ टक्के उताराची सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन असावी लागते. काळी भारी पाणी साचून राहणारी अल्कलीयुक्त अगर चोपण जमिनीत लागवड करू नये तसेच एक फुटाच्या खोलीवर खडक लागल्यास लागवड थांबवावी.
सीताफळाच्या वेगवेगळ्या जाती
१) धारूर - ६
मराठवाडा कृषी विद्यापीठाने मराठवाडा विभागाच्या लागवडीसाठी प्रसारित केलेली ही एक प्रमुख जात या जातीची फळे आकाराने मोठी असून गराचे प्रमाण यामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात असते तसेच विद्राव्य घटकांचे प्रमाणही खूप जास्त आहे. इतर जातींच्या तुलनेने फळांची गोडी अधिक असून साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.
२) टि.पी. -७
सीताफळाची ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने ही जात सन २००० मध्ये शिफारशीत केली असून फळाचे वजन ४०० ते ५०० गॅम आहे यातील विद्राव्य घटकांचे प्रमाण ४८ टक्के असून गराचे प्रमाण ५५ टक्के आहे या जातीची फळे हिरव्या रंगाची असून याचे प्रमाण खूप कमी आहे प्रत्ये धोक झाडापासून ७० ते १०० फळे उत्पादन अपेक्षित आहे._
३) बाळानगर
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली व आंध्र प्रदेशात विकसित केलेली ही जात या जातीच्या फळाचे सरासरी वजन २६६ ग्राम असून गराचे प्रमाण ४८ टक्के प्रत्येक झाडापासून ५० ते ६० पाढे मिळणे अपेक्षित आहे फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण आणि २७ टक्के असून बियांचे प्रमाण हे तीन टक्के एवढे आहे.
४) अर्का सहान
ही सीताफळाची जात भारतीय बागवानी संस्था बंगलोर येथे विकसित केली गेली आहे या जातीची फळे दिसायला आकर्षक गोलाकार असून फळांचा रंग फिक्कट हिरवा तर डोळे पसरट चपटे असतात. फळाचे वजन ४०० ते ५०० ग्रॅम असून गराचे प्रमाण ४८ टक्के आहे तर विद्राव्य घटक किती टक्के आहेत फळे खाण्यास फारच गोड आहेत या फळांमध्ये बियाची संख्या फार कमी असून आकाराने लहान असतात फळावरील दोघांमधील अंतर कमी असल्याने पिठ्या ढेकूण या किडीचे प्रमाण कमी आढळते इतर जातींपेक्षा या जातीची फळे अधिक काळ टिकतात.
५) फुले पुरंदर
पुणे पुरंदर ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सन २०१४ मध्येच महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केली होती या जातीची फळे आकर्षक, आकाराने मोठी असून फळाचे वजन हे ३६० ते ३८८ ग्राम असून गराचे प्रमाण हे ४५ ४८ टक्के आहे. प्रत्येक झाडापासून ११८ ते १५४ फळाचे उत्पादन मिळते फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण २२ ते २४ टक्केव घट्ट रसाळ, आल्हाददायक असतो घरातील पाकळ्या पांढऱ्याशुभ्र असून त्यांची संख्याही जास्त आहे फळात बियांची संख्या अतिशय कमी असून जातीच्या फळांचा ग्राम पासून तयार केलेल्या रबडीला जास्त मागणी आहे.
सीताफळाच्या झाडांची लागवड
सिताफळ सिताफळाची लागवड करताना पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये कलमे अगर रोपे लावावीत रोपे लावताना मध्यभागी लहान खड्डा करून लावावी तसेच माती हाताने दाबून काठीचा आधार देउन बांधावी व पाऊस नसेल तर लगेच झारीने पाणी द्यावे. सीताफळ लागवड अंतर व्सियवस्ताथित ठेवावे लागते.
फळाचे लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवून उन्हामध्ये तापवुन घ्यावे नंतर पावसाळ्यापूर्वी हलक्या व मुरमाड जमिनीत ४ बाय ४ मीटर, मध्यम जमिनीत ५ बाय ५ मीटर अंतरावर, ४५ बाय ४५ सेंमी. आकारमानाचे खड्डे घ्यावेत प्रत्येक खड्ड्यात एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० ग्राम दोन टक्के मिथिल पॅराथिऑन पावडर यांचे मिश्रण टाकावे सोबत शेणखत टाकावे त्याच्या वापरामुळे सिताफळाच्या वाढीस मदत होते.
लेखक- प्रविण सरवदे, कराड
Share your comments