वातावरणात दिवसेंदिवस बदल पाहायला मिळत आहे, कधी कमी-जास्त तापमान तर कधी अवकळी पाऊस यामुळे आंबा वनस्पतीची फळगळती,फळावरील रोग किंबहुना आंबा उत्पादनात घट होत असते. त्यामुळे शेतकरी बंधुनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
* फळगळती व फळावरील येणाऱ्या रोगाचे कारण
मोहर येऊन गेल्यानंतर साधरणत: मार्च-एप्रिल मध्ये आंबे यायला सुरुवात होते. सामान्यपणे याच महिन्यामध्ये वातावरणात बऱ्याच प्रमाणात पिकासाठी अनावश्यक असे बदल होतात. यात प्रामुख्याने हवा ही कोरडी व उष्ण वाहू लागते, जी सुष्क होऊन जाते व वातावरणमध्ये नमी राहत नाही, त्यामुळे पिकामधे जीवनसत्व, नायट्रोजनची कमतरता भासून फळ लागून ही त्याची पूर्णता वाढ होत नाही परिणामी त्याची गळती होते.
२. फळ लागणीच्या वेळेस झाडाला पाण्याचा पुरवठा कमी असल्यास फळ संकुचित पावतात व ही पिकण्यापूर्वीच जमिनीवर गळून पडतात.
३. बहुतांश वेळेस अपुऱ्या परागकण प्रक्रियेमुळे तसेच अतिघन बागेतील झाडामध्ये पोषण तत्वासाठी आपापसात होणाऱ्या प्रतीस्पर्धेमुळे देखील फळांची वाढ स्थगित होऊन गळती होते.
४. वनस्पतीची वाढ नियामक PGR पीजीआरची कमतरता आढळल्यास, फळांवर किडी आणि रोगाचां प्रादुर्भाव होत असतो.
५. मोहरच संरक्षण केल्यानंतर आंब्यावर फळमाशी, पिठ्या ढेकूण, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या अनेक घातक किडयाचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचप्रकारे पानावर, फळावर काळी बुरशी पाहायला मिळते, ज्यामुळे आंब्याची घट झालेली दिसते. दुर्गंध, काळ्या रंगाचे टिपके व अति पिकलेली फळ यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनास मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
*फळगळती व रोग यावरील नियंत्रणात्मक उपाययोजना *
१ . उष्ण वातावरणामुळे झाडामध्ये पाण्याची कमतरता भासते म्हणून फळ धारनेच्या काळात झाडाला वेळोवेळी भरपूर प्रमाणात पाणी द्यावे. त्यामुळे फळगळती थांबते, झाडामध्ये नमी टिकून राहून फळे ही रोगमुक्त व जमिनीतून पोषण तत्वाचा शोषण करत राहतात. झाडामध्ये होणाऱ्या सर्व जैविक-रासायनिक प्रक्रियेला प्रतिसाद देत फळ ही काढणीसाठी परिपक्व बनतात.
२. झाडाला पाणी दिल्यानंतर दीर्घकाळ त्याचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी आपण प्लॅस्टिक मलचिंगचे व्यवस्थापन करून फळ गळती रोखू शकतो
(टीप : आंब्याला ठिबक सिंचन ने पानी पुरवठा करावा )
३. आंबा पिकावरील भुरी रोग हा विशेषतः गंभीर मानला जातो. यात फळे ही विकृत होतात त्याचा रंग हा साधारण रंगापेक्षा फिकट होत जातो व आंबा हा पिकण्यापूर्वीच गळून पडतो.
व्यवस्थापन : सल्फर ८० wp (०.२ %), २ ग्राम सलफेक्स प्र.लि, ट्रायडेमोरफ ०.१% (१ मी.लि क्यालिक्झिण प्र.लि) व बाविसटीन @०.१% दर १५ दिवसाच्या कालावधीत फवारावा.
हेही वाचा : पेरुतील किडी व रोगांची ओळख आणि व्यवस्थापन
४. फळमाशी ही फलगळतीचे कारण:
फळ गळतीला मुख्य कारणीभूत फळमाशी असते. फळ धारणेनंतर फळे जशी-जशी मोठी व्हायला लागतात तसेच आंब्यावरील फळमशीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. फळ पिकल्यानंतर फळाच्या वरच्या लुसलुशीत कांतीमध्ये ही फळमाशीतली मादा अंडी घालते व ४-५ दिवसामध्ये त्यातून अळी बाहेर निघते ही अळी फळाचा पूर्ण गाभा खाऊन टाकते, अंडी घातलेल्या फळावर काळ्या रंगाचा डाग निर्माण होतो व त्यातून सुद्धा जिवाणू आत शिरतात व फळ कुजायला लागत सरतेशेवटी फळ गळून पडते.
फळमाशीचे एकात्मिक कीड नियंत्रण :
१. किडलेले फळ खाली पडल्यानंतर त्यातल्या अळ्या पुन्हा कोष्यावस्थेत जातात व पुन्हा नुकसान करायला तयार होतात त्यामुळे शेतातमध्ये किंवा बागेत स्वच्छता राखण गरजेच आहे, तणविरहित शेत करावे व त्याचप्रमाणे खाली पडलेली फळ गोळा करून जाळून टाकावी.
२. कपड्याच्या लहान पिशव्या किंवा पॉलीबॅग यांनी फळाला झाकून फलमाशीचा प्रवेश रोखता येतो.
३. मोठया बागेत /शेतात फळाचे रक्षण करण्यासाठी रक्षक सापळयचा चा ९/हेक्टर असा वापर करावा.
४. २० मी.लि मेलयआथिऑन व २०० ग्राम गूळ ही २०० लि पाण्यात ढवळून फळावर मारावे.किटकनाशकाचे डोज जास्त प्रमाणात दिल्यास ग्राहकाला त्याचे विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी.
५. तुडतुडे व फुलकिडे हे फलगळतीचे कारण :
तुडतुडे व फुलकिडे ही देठातील रस शोषून घेतात व देठला फळाचे वजन पेलल्या जात नाही म्हणून बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला लहान-लहान फळ खाली पडलेली आढळून येतात. रसशोषण करतांना हे किडे आपल्या अंगाद्वारे चिकट द्रव बाहेर टाकतात व त्यामुळे पानावर,फळावर काळ्या रंगाच्या बूरशीची वाढ होते. या बुरशीमुळे देखील आंब्याची घळ पाहायला मिळते .
व्यवस्थापन :
-
तुडतुडयाच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड 4 मिलि /10लि पानी ,क्वीनॉलफोस १८ मिलि प्रती १० लि पानी+ डायथानियम ४५ @ ३० ग्राम/१५ लि पाणी .ल्यांबडासायलोथरिंन १२ मिलि/१५ लि पंप , (बुरशीनाशक) कॉपर ऑक्सीकलोरइड २५ ग्राम.फवारणी करावी. (टीप: फुलकिडेवर इमिडाकलोप्रीड मारू नये)
-
लहान आंब्याच्या गळतीसाठी NAA१०-१५ PPM साधारणत १०-१५ ग्रॅम प्रती लिटर फवारणी केली तर फळगळ थांबवता येते. (0:52:34) या विद्रव्य खताचा फवारा जर दिला तर आंब्याची वाढ मोठी होते. (टीप: खत किंवा NAA हे वेगळ मारावे, किटाकनाशकंबरोबर मिसळून मारू नये)
-
6. झाडाला पोटाशियम डोज योग्य दरात द्यावा व नायट्रोजनचे प्रमाण कमी ठेवावे कारण असे न केल्यास फळ गळतीला वेग मिळतो. वनस्पतीची वाढ नियामक PGR (plant growth regulator) चा आवशकतेनुसार वापर करावा.
- *जर पुन्हा पाऊस पडला तर फळगळ होऊ नये म्हणून वरील सांगितलेल्या बंदोबस्ताच्या उपाय योजनेचा वापर शेतकरी बंधुंनी केल्यास उत्तम-दर्जेदार आंब्याची लागवड होते व उत्पादनात झपाट्याने वाढ होते.
लेखक
कु. अचल देवेंद्र इंगळे
बी.एस.सी.कृषी (अंतिम वर्ष विद्यार्थी)
स्व. लालासाहेब देशमुख कृषी महाविद्यालय, तिवसा. ता. तिवसा जि. अमरावती
Share your comments