भारतात मोठया प्रमाणात फळबाग लागवड केली जाते. फळबाग पिकात एक महत्वाचे पीक म्हणजे पेरूचे पीक. पेरूच्या बागा ह्या संपूर्ण भारतात आढळतात, महाराष्ट्रात देखील पेरूच्या बागा ह्या पाहवयास मिळतात. अनेक शेतकरी पेरूची लागवड करतात आणि त्यातून चांगली कमाई देखील करतात. पेरूला हि चांगल्या मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे ह्याची लागवड करून सहजरीत्या चांगली मोठी कमाई करता येणे शक्य आहे.
असे असले तरी इतर पिकाप्रमाणे या पिकावर देखील अनेक रोग अटॅक करत असतात, त्यामुळे त्याचे उत्पादन हे लक्षणीय घटू शकते आणि त्यामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून आज आपण पेरू पिकावर अटॅक करणाऱ्या काही प्रमुख रोगाविषयीं आणि त्यावरील उपचाराविषयीं जाणुन घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया पेरूवरील प्रमुख रोग आणि उपचार.
फळ कुज (Fruit Rot)
फळ कुज हा फळबाग पिकावर येणारा एक प्रमुख रोग आहे. पेरू पिकावर देखील फळ कुज मोठ्या प्रमाणात अटॅक करतो आणि त्यामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कृषी वैज्ञानीकांच्या मते हा रोग पावसाळ्यात जास्त प्रमाणात घातक ठरतो आणि साधारणता हा पावसाळ्यातच पेरूच्या बागावर पाहवयास मिळतो.
उपचार
फळ कुजने प्रभावित फळे हि तोडून घ्यावी आणि बागेबाहेर काढून नष्ट करावीत. हा रोग जर पेरू बागावर दिसला तर 0.2 टक्के डायथेन झेड-78 ची फवारणी करावी असा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात. तसेच माती मध्ये आदर्ता असते त्यामुळे 0.3 टक्के कॉपर ऑक्सिक्लोराईडने बागेतील मातीवर प्रक्रिया करून घ्यावी असे देखील सांगतात यामुळे या रोगावर नियंत्रण प्राप्त केले जाऊ शकते आणि होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
एंथ्रेक्नोज
हा रोग देखील फळबागावर मोठया प्रमाणात आपल्याला दिसत असेल. ह्या रोगात फळावर काळ्या रंगाचे ठिपके तयार होतात आणि फळांची वाढ हि पूर्णतः खुंटते तसेच फळे हि सडायला सुरवात होते व झाडांची पाने हि सुकतात
त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट पाहायला मिळू शकते.
उपचार
हा रोग पेरूच्या बागेत दिसला की आपण त्याच्या प्रतिबंधासाठी 2 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 3 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड एक लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून झाडावर फवारणी करावी, या उपचाराने ह्या रोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येऊ शकते आणि उत्पादन कमी होण्यापासून वाचवले जाऊ शकते.
Share your comments