भारतात द्राक्षे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात द्राक्षे लागवड ही सर्वात जास्त केली जाते. पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे लागवड ही लक्षणीय आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातील एकूण द्राक्षे उत्पादनाच्या 70 टक्के उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात पावलो पावली द्राक्षेच्या बागा आपल्याला पाहवयास मिळतील हेच कारण आहे की नाशिक जिल्ह्याला वाईन सिटी म्हणुन प्रसिद्धी मिळाली आहे. द्राक्षे हे चवीला खुपच रुचकर असते शिवाय ह्यांचे सेवन मानवी आरोग्यासाठी लाभदायक असते.
द्राक्षेच्या ह्या गुणांमुळे ह्याची मागणी ही वर्षभर बनलेली असते त्यामुळे द्राक्षे पिकाला भारतात तसेच महाराष्ट्रात चांगला मोठा बाजार उपलब्ध आहे. त्यामुळे भारतात तसेच महाराष्ट्रात ह्याची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकरी बांधव करतात आणि चांगला नफा मिळवतात. महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश,पंजाब, हरियाणा, राजस्थान ह्या राज्यात देखील द्राक्षे लागवड केली जाते. द्राक्षे लागवड शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पाडते परंतु जर ह्या पिकात रोगाचा शिरकाव झाला तर मग द्राक्षे लागवड शेतकऱ्यासाठी तोट्याचे सिद्ध होते. त्यासाठी वेळेवर द्राक्षे पिकात लागलेल्या रोगावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. म्हणूनच आज आम्ही आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी द्राक्षे पिकात लागणारे रोग व त्यावरील उपचार ह्याविषयीं महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणुन घेऊया ह्याविषयीं सविस्तर
थ्रीप्स
थ्रिप्स अंडाकृती, काळ्या रंगाचे लहान किडी असतात ह्या किडी नेहमी पानांच्या खालच्या बाजूला आपली अंडी जमा करतात. निम्फस म्हणजे बाल अवस्थेतील किड आणि प्रौढ अवस्थेतील थ्रीप्स किड दोघेही पानाच्या खालच्या बाजूचा रस चोखतात. प्रभावित भाग लांबून देखील ओळखणे शक्य असते. थ्रिप्स द्राक्षे पिकाच्या फुलोरावर आणि नवीन येणाऱ्या द्राक्षेच्या घडावर देखील हल्ला करतात. प्रभावित द्राक्षेचे फळ क्रॉकी लेयर विकसित करतात आणि पिकल्यांनंतर ही प्रभावित फळे तपकिरी रंगाची होतात.
नियंत्रण
फॉस्फेमिडियन (0.05%) किंवा मोनोक्रोटोफॉस (0.1%) किंवा मॅलॅथिऑन (0.05%) सारख्या कीटकनाशकांच्या फवारण्या थ्रीप्स किडीवर चांगले नियंत्रण मिळवून देतात. ह्या फवारणी मुळे द्राक्षे पिकाची होणारी हानी कमी करता येते. द्राक्षे पिकाला फुल लागल्यानंतर नंतर आणि फळांच्या वाढीदरम्यान प्रोफिलेक्टिक स्प्रे म्हणजे कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे आणि तसा सल्ला द्राक्षे उत्पादक शेतकरी देखील देतात.
लीफ स्पॉट
लीफ स्पॉट ह्या रोगामुळे, द्राक्षेच्या पत्तीवर गोलाकार किंवा अनियमित आकाराचे गडद तपकिरी किंवा फक्त तपकिरी ठिपके तयार होतात. त्यामुळेच ह्या रोगाला लीफ स्पॉट असे नाव पडले आहे. ह्या गोलाकार ठिपक्यांचा मध्य भाग हा राखाडी रंगाचा असतो.
ह्या लीफ स्पॉटचे प्रमाण पिकावर वाढायला लागले की, प्रकाश संश्लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होतो आणि पिकाच्या वाढीला लागणारं पोषकतत्वे पिकाला मिळत नाहीत व द्राक्षे फळांची वाढ त्यामुळे खुंटते परिणामी ह्यामुळे द्राक्ष उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.
नियंत्रण
»ह्या लीफ स्पॉट रोगाच्या प्रतिबंधासाठी रोगग्रस्त, प्रभावित पाने गोळा करून जाळली पाहिजेत.
»जेव्हा ह्या रोगाची लक्षणे पानावर दिसायला सुरवात होते तेव्हा 3.0 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा 2.5 ग्रॅम झिनेब प्रति लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. ह्यामुळे ह्या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि उत्पादन वाढवता येते.
Share your comments