
jwaar crop
खरीप हंगामामध्ये चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी मुख्यत्वेकरून मका,ज्वारी,बाजरी व काही प्रमाणात संस्करित चारा पिके जसे की नेपियर, मारवेल इत्यादी पिकांची लागवड केली जाते. सामान्यतः धान्यासाठी घेतल्या जाणाऱ्या संकरित व सुधारित वाणाची गुणवत्ता व उत्पादन तुलनेने कमी असते.
पुढे चाऱ्यासाठी खास विकसित केलेल्या ज्वारीच्या सी एस व्हीचाळीस एफ या वाणाच्या हिरव्या व वाळलेल्या कडब्याची गुणवत्ता वसकसपणा अधिक असतो.
सीएसव्ही 40 एफ या वाणाचे प्रमुख वैशिष्ट्य
- दूध उत्पादकांची आवश्यकता ही निव्वळ चारा पिकांची असते. अशा दूध उत्पादकांची गरज लक्षात घेऊन परभणी येथील ज्वारी संशोधन केंद्र आणि सीएसव्ही 40 एफ हा ज्वारी पिकाचा चारा वाण विकसित केला आहे.
- या वाणाची उत्पादन क्षमता ही हिरव्या चाऱ्याची हेक्टरी 45 ते 46 टन आहे. तसेच वाळलेला चारा हेक्टरी 14 ते 15 टन मिळतो.
- या वानाच्या कडब्याची प्रत उत्तम असून पाचन क्षमता 54.48 टक्के प्रथिने,7.7 टक्के उंच वाढणारा, हिरवा गार, लांबरुंद पाने, मध्यम गोड रसाळ धांडा,खोडमाशी, खोडकिडा तसेच पानावरील ठिपके यास मध्यम सहनशील
पेरणीचा कालावधी
खरीप ज्वारी प्रमाणे चारा ज्वारीची लागवड जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान करावी. पेरणी उशिरा केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे संशोधनात आढळले आहे.
पेरणीचे अंतर
या वाणाची पेरणी करताना दोन तासातील अंतर 25 सेंटीमीटर व दोन ताटातील अंतर दहा सेंटिमीटर इतके राहील अशा पद्धतीने तिफणीच्या साह्याने पेरणी करावी. दोन तासातील व दोन ताटातील अंतर कमी ठेवल्यास ज्वारीचे धांडे बारीक पडतात. परिणामी जनावरांना खाण्यास व पचनास फायदेशीर ठरते.
खत व्यवस्थापन
हे पीक नत्र व स्फुरद यांनी सकारात्मक प्रतिसाद देणारे आहे. या वानास वाढीच्या योग्य अवस्थेत व योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खतांचा वापर केल्यास हिरवा आणि वाळलेल्या चाऱ्याच्या उत्पादनात भरघोस वाढ होते.हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश यांचा पुरवठा करावा. पैकी पेरणी करताना नत्राची अर्धी मात्रा (50 किलो हेक्टरी) स्फुरद व पालाश यांची संपूर्ण मात्रा द्यावी. उरलेले अर्धे नत्र मात्र पिकाच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर सुमारे 30 ते 40 दिवसांनी द्यावी.
Share your comments