1. फलोत्पादन

Clorosis Disease: केळीवरील खतरनाक आहेत क्लोरोसिस आणि क्राऊनरॉट हे रोग, अशा पद्धतीने करा व्यवस्थापन

जगामधील केळी उत्पादक देशांपैकी भारत हा एक प्रमुख उत्पादक देश आहे.भारतात केळीचे उत्पादन हे पहिल्या नंबरवर असून दरवर्षी साडेसात लाख हेक्टदरवर लागवड होते व त्या माध्यमातून सुमारे तीस दशलक्ष टन उत्पादन मिळते.केळी पिकावर देखील अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
banana leaf

banana leaf

जगामधील केळी उत्पादक देशांपैकी भारत हा एक प्रमुख उत्पादक देश आहे.भारतात केळीचे उत्पादन हे पहिल्या नंबरवर असून दरवर्षी साडेसात लाख हेक्‍टरवर लागवड होते व त्या माध्यमातून सुमारे तीस दशलक्ष टन उत्पादन मिळते.केळी पिकावर देखील अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो.

 बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव हा लागवडीपासून ते काढणीपर्यंत दिसून येतो. या लेखात आपण केळी पिकावरीलक्लोरोसिस म्हणजेच हरितलोपरोग आणि मुकुट सड म्हणजेच क्राऊन रॉटया रोगाबद्दल माहिती घेऊ.

 केळी पिकावरील मोझाईक किंवा हरितलोप (क्लोरोसिस ) रोग-

या रोगाची लागण प्रामुख्याने ठाणे,नाशिक,जळगाव, धुळे आणि पुणे या जिल्ह्यात आढळून आलेली आहे.या रोगाचीपिकाला लागण झाल्यास पानावर हरितद्रव्य दिसत नाहीव पिवळसर पट्टे सर्वत्र विखुरलेले दिसतात.अशी रोगट झालेल्या झाडांची वाढ खुंटते.ही झाडे पूर्णपणे वाढत नाही. वाढल्यास त्यांना क्वचित प्रमाणात घड लागतात.वाढीच्या सर्व अवस्थांत केळीच्या झाडाला या रोगाची बाधा होते. या रोगाची लागण एका झाडापासून दुसऱ्या झाडांना व बागेत घेतलेल्या आंतर पिकांना देखील होते.

या रोगाचे व्यवस्थापन

मुनवे वगड्डेरोगमुक्त प्रदेशातून आणावे. मेलेली झाडे उपटून त्यांचा नाश करावा.  गड्डे बुरशीनाशकाच्या द्रावणात 90 मिनिटे बुडविलास व नंतर सात दिवस कडकउन्हात सुकवून लागवड केल्यास केळी पिकाचा या रोगापासून बचाव होतो.

केळी पिकावरील मुकुटसड (क्राऊन रॉट ) रोग आणि उपाय

या रोगाची लागण ही ज्यावेळी केळी फळाची फनीघडापासून वेगळी करताना जी जखम होतेतेव्हा तिथून विविध प्रकारच्या बुरशी फळांच्या देठातून आत प्रवेश करतात.या रोगट बुरशी बागेत पानांच्या कचऱ्यात व फुलांवर आढळतात.बहुतेक ही बुरशी मुकुटाचा पृष्ठभागाजवळदिसते. मुकुटाचा बुरशीच्या जीवाणूंचा प्रसार वाऱ्या द्वारे किंवा पावसाच्या पाण्यामार्फत होतो. या रोगाची लागण झालेल्या केळीच्या देठाकडील भागावर पांढऱ्या करडे किंवा गुलाबी रंगाची बुरशीची वाढ दिसते.पुढे हा भाग काळा पडून कुजू लागतो. तसेच घड काढताना तोडलेल्या घडाच्या उघड्या भागातूनया बुरशीचा शिरकावकेळीत होतो.

या रोगाचे नियंत्रण

1-या रोगाची लागण ज्या बागेत झाली असेल ती बाग स्वच्छ ठेवावी.केळी फळांचे पॅकिंग करताना नेहमी स्वच्छ ठिकाणी करावे.

2-केळी घडाची काढणी करताना धारदार शस्त्र वापरावे व काढणी केल्यानंतर घडावर आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी.

3-काढणी केल्यावर घड लगेच थंड करून घ्यावेत.

4- तुलनात्मक दृष्ट्या केळी पिकावर किडींचा फारसा प्रादुर्भाव होत नाही.परंतु काहीवेळेस मावा,केळीवरील सोंडे कीड,खोडकीड,सूत्रकृमी इत्यादी किडींचा उपद्रव केळी बागेत आढळते.या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य त्या कीटकनाशकाचे 15 ते 20 दिवसांच्या अंतरानेतीन ते चार फवारण्या द्याव्यात.

English Summary: crown rot and clorosis is harmful disease in banana crop Published on: 09 December 2021, 05:32 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters