बरेच शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे फळबागांची लागवड करतात. यामध्ये पपई लागवडीचे प्रमाण देखील खूपच आहे. महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्वच भागांमध्ये पपई लागवड केली जाते.
तसे पाहायला गेले तर पपई लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो. परंतु बऱ्याचदा असे होते की, हवामानात अचानक बदल किंवा इतर कारणांमुळे पपई फळ पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. परंतु यामध्ये बुरशीच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी अँथ्रॅकनोज बुरशी सर्वात घातक आहे.या लेखात आपण या वर्षी विषयी सविस्तर जाणून घेऊ.
अँथ्रॅकनोज बुरशी विषयी माहिती
अँथ्रॅकनोज हा महत्त्वाचा बुरशीजन्य रोग आहे.कोलेटोट्रिकम ग्लोईओस्पोरी ऑईड्स नावाच्या जमिनीत राहणार या बुरशीमुळे हा रोग होतो. ही बुरशी जमिनीवरील पिकांच्या अवशेषांमध्ये जिवंत राहते.अनुकूल हवामानामध्ये निरोगी, जखम झालेल्या फळांवर वाऱ्याच्या माध्यमातून किंवा पावसाच्या पडणाऱ्या पाण्यामुळे पसरते. मध्यम तापमान, अतिशय उच्च आद्रता आणि जमिनीचा कमी सामू या रोगाच्या वाढीसाठी अनुकूल असतात.
कडक ऊन, कोरडी हवा किंवा अतिशय जास्त तापमान या बुरशीच्या वाढीसाठी प्रतिकूल आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या बुरशीला तिचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी लागन झालेली फळे एका विशिष्ट प्रमाणात पर्यंत पिकणे गरजेचे आहे.
या बुरशीचे लक्षणे
अँथ्रॅकनोज बुरशी पानांवर व देठावर दिसते. असे असले तरी हा प्रामुख्याने फळांचा रोग आहे. झाडाच्या च्या ज्या पानांवर या बुरशीचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे पानाच्या कडा गडद पिवळी दिसतात. काही काळाने हे डाग एकमेकांमध्ये मिसळल्या सारखे दिसतात व मोठे होतात. पानांवर करपलेले भाग तयार होतात.
अगदी प्रादुर्भाव होण्याच्या सुरुवातीच्या काळात फळांच्या सालीवर लहान व फिकट रंगाचे ठिपके दिसतात. परंतु फळे जेव्हा पिकायला येतात तेव्हा हे डाग मोठ्या आकाराचे, गोल गडद तपकिरी रंगाचे होतात.
या बुरशीवर जैविक नियंत्रण
यावर बॅसिलस सबटिलिस आधारित बुरशीनाशक वापरले तर चांगला परिणाम दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बियाण्यावर किंवा फळांवर गरम पाण्याचे उपचार म्हणजे जवळजवळ 41 डिग्री सेल्सिअस गरम पाण्यात 20 मिनिटे बुडवून ठेवले तर बुरशीचे काही अवशेष राहिले असतील तर ते मरतात आणि रोगाचा प्रसार शेतात किंवा इतर मार्गांनी निरोगी झाडांवर किंवा पानांवर होत नाही. जेव्हा आपण झाडावरून एकादस संक्रमित भाग काढतो तेव्हा त्या जागीबोर्डो पेस्ट लावावी.
10 ते 12 दिवसांच्या अंतराने लागोपाठ तीन वेळा फवारणी करणे गरजेचे असते. जर रासायनिक उपचार करायचे असेल तर त्यामध्ये क्लोरोथँलोनील, अझोक्सीस्टरॉबिन किंवा कॉपर सल्फेट असणाऱ्या बुरशीनाशकांची लागोपाठ तीन वेळा 10 ते 12 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. जेव्हा आपण बीजप्रक्रिया करतो तेव्हा सुद्धा बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे.
Share your comments