शेतीमध्ये दिवसेंदिवस आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन वाढीसाठी निरंतर प्रयत्न करण्यात येत आहेत.सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे केंद्र सरकारचे लक्ष असून त्यादृष्टीने केंद्र सरकारकडून विविध योजना व त्या माध्यमातूनत्यांना अनुदान स्वरूपात मदत केली जात आहे
त्याचाच एक भाग म्हणून प्लॅस्टिक मल्चिंग पेपर वर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पन्नास टक्के अनुदान दिले जात आहे.आपल्याला माहिती आहे तुम्ही प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचावापर हा विविध प्रकारची फळझाडे व भाजीपाला पिकांभोवती आच्छादन स्वरूपात केला जातो जेणेकरून पाण्याचे बाष्पीभवन जास्त होऊ नये व पिकांचे कीड व रोगराई पासून संरक्षण करण्याच्यदृष्टीने मल्चिंग पेपर महत्त्वाचा आहे. या लेखात आपण या लेखात आपण मल्चिंग पेपरवरमिळणाऱ्या अनुदानाविषयी माहिती घेणार आहोत.
प्लास्टिक मल्चिंग साठी असलेल्या अनुदानाच्या स्वरूप
यामध्ये सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी बत्तीस हजार रुपये खर्च येतो. या मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत या खर्चाच्या 50 टक्के म्हणजे सोळा हजार प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते.
तर डोंगराळ भागाचा विचार केला तर हा खर्च 36 हजार आठशे निश्चित करण्यात आला असून त्याच्या 50 टक्के रक्कम ही अनुदान स्वरूपात दिली जाते. या अनुदान योजनेचा लाभ हे सहकारी संस्था, बचत गट, विविध शेतकरी समूह व शेतकरी उत्पादक कंपनी घेऊ शकतात.
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना लागणारे कागदपत्रे
- सगळ्यात प्रथमhttps://mahadbtmahait.gov.inया संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- त्यानंतर सातबारा उतारा
- 8 अ उतारा
- संबंधित लाभार्थ्यांची आधार कार्डची झेरॉक्स
- आधार कार्ड लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स
शेतकऱ्यांनी या अनुदान लाभासाठी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर सगळी कागदपत्र घेऊन तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा.
त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडूनपूर्व संमती मिळाल्यानंतर मल्चिंग पेपर खरेदी करावा. या अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात थेट PFMS प्रणालीद्वारे जमा केली जाते. व हे अनुदान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तरावरून वितरित करण्यात येते.
पिकांच्या कालावधीनुसार प्लास्टिक मल्चिंग पेपर चे प्रकार
- या पिकांचा कालावधी तीन ते चार महिने आहे अशा पिकांसाठी 25 मायक्रोन जाडीचे युवी स्टेबलाइज्डफिल्मचापेपर गरजेचे आहे.
- 11 ते 12 महिन्याच्या फळपिकांसाठी 50 मायक्रॉन जाडीचा यु व्ही स्टॅबिलाइझडपेपर उपयोगी असतो.
- यापेक्षा जास्त कालावधी त्या पिकांचा असेल अशा पिकांसाठी 100 ते 200 मायक्रॉन जाडीचा युव्हीस्टॅबिलायझ्डफिल्म चा पेपर आवश्यक असतो.
Share your comments