1. आरोग्य सल्ला

भोपळ्याची चव अन् काकडीच्या आकाराची झुकिनी आहे गुणकारी; वाचा फायदे

देशातील बाजारपेठांमध्ये देश-विदेशातून अनेक प्रकारचा भाजीपाला येत आहे. हा विदेशी भाजीपाला लोकांच्या पसंतीस उतरत असून प्रत्येकांच्या तोंडी या भाज्यांचे नाव आहे. अशाच प्रकारे चीनमध्ये उत्पादित करण्यात येत असलेला ड्रग्न फ्रुट भारतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

KJ Staff
KJ Staff


देशातील बाजारपेठांमध्ये देश-विदेशातून अनेक प्रकारचा भाजीपाला येत आहे. हा विदेशी भाजीपाला लोकांच्या पसंतीस उतरत असून प्रत्येकांच्या तोंडी या भाज्यांचे नाव आहे. अशाच प्रकारे चीनमध्ये उत्पादित करण्यात येत असलेला ड्रग्न फ्रुट भारतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आता अशीच एक भाजी भारताच्या बाजारात आली असून य़ा भाजीची मागणी वाढत असून नागरिकांच्या स्वयंपाकात याचा समावेश होत आहे. या भाजीचे नाव आहे झुकिनी.  झुकिनी हे इटालियन नाव आहे,  इटलीतून या भाजीचा प्रसार अमेरिका, मेक्सिको, फ्रान्स, तुर्कस्तान, ब्राझील, चीन, जर्मनी आणि भारत अशा देशात झाला.

  समर स्क्वॅश आणि विंटर स्क्वॅश या नावाने झुकिनी या भाजीपाला पिकास ओळखले जाते. त्याची शास्त्रीय नावे अनुक्रमे कुकुर बीटा म्याझिमा आणि कुकुर बीटा पेपो अशी आहेत. या दोन्ही प्रकारातील झाडे बुटकी झुडूप वजा असतात. झुकिनीच्या झुडूप वजा झाडांवर नर व मादी अशा दोन्ही प्रकारची फुले असतात. नर फुलांचा आकार मादी फुलांच्या आकारापेक्षा लहान असून दोन्ही फुलांचा रंग पिवळा असतो. बऱ्याच देशांत खाण्यासाठी किंवा पदार्थ सजविण्यासाठी झुकिनीच्या फुलांचा उपयोग केला जातो. झुकिनीच्या फळाला काकडी आणि दुधी भोपळ्याची मिश्रित चव असते तर काकडी सारखाच आकार असतो.

झुकिनी आरोग्यासाठी फायदेशीर

 झुकिनी या भाजीत भरपूर प्रमाणात जीवनसत्वे खनिजे, तंतुमय पदार्थ स्निग्ध पदार्थ उपलब्ध असतात. झुकिनीच्या फळांच्या सालीमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात. झुकिनीच्या फळाचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठीही केला जातो कारण त्या फळांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. उच्च प्रकारचा रक्तदाबही नियंत्रित केला जातो.

 सध्या महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा लहान क्षेत्रात झुकिनीचे उत्पादन येत आहे. फळांचे उत्तम प्रत, किडी रोग नियंत्रण, इत्यादी बाबत आपल्या महाराष्ट्रामध्ये तांत्रिक माहितीचा बराचसा अभाव आहे. जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी झुकिनी बद्दल असलेली माहिती व आवश्यक तंत्रज्ञान यांचा अभ्यास करून जर झुकिनीची लागवड केली तर त्यातून चांगल्याप्रकारे आर्थिक फायदा होऊ शकतो.

English Summary: Zucchini The taste of pumpkin and shaped like cucumber is good to health Published on: 23 July 2020, 06:29 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters