1. आरोग्य सल्ला

हो, पुरूषांना देखील होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

कर्करोग हा जगात एक मोठी समस्या निर्माण करणारा रोग होत आहे, त्यात ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त महिलांना होतो अस समजलं जायचं परंतु हल्ली पुरुषांमध्ये देखील याचे प्रमाण वाढत आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हो, पुरूषांना देखील होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

हो, पुरूषांना देखील होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

जगभरात आढळणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या उदाहरणांमध्ये पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण कमी आहे. मात्र पुरुषाला हा कर्करोग होतो, तेव्हा तो स्त्रियांच्या तुलनेत अधिक प्राणघातक असतो.

पुरुषांमधल्या ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं काय आहेत?

स्तनाच्या भागात गाठ, अनैसर्गिक वाढ, अल्सर, दुर्गंध ही पुरुषांमधल्या ब्रेस्ट कॅन्सरची चार प्रमुख लक्षणं आहेत. कोणतंही लक्षण आढळल्यास लवकरात लवकर तपासणी करून घेणं चांगलं.

पुरुषांचा ब्रेस्ट कॅन्सर अन्य अवयवांत पसरू शकतो का? 

तसा पसरण्याची शक्यता खूप जास्त असते. यापैकी अनेक पेशंट्स कॅन्सरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तोपर्यंत उशीर झालेला असतो. या कालावधीत कॅन्सर मान, छातीची पोकळी, यकृत, फुप्फुसं आणि काही वेळा अगदी मेंदूतही पसरलेला असू शकतो. पुरुषांमध्ये स्तनाच्या ऊतींचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे तिथून कॅन्सर शरीरात पसरण्याची शक्यता जास्त असते.

ब्रेस्ट कॅन्सरचा सर्वांत जास्त धोका कोणत्या पुरुषांना असतो?

40 ते 60 या वयोगटातल्या पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो. गायनॅकोमास्टिया अर्थात स्तन ग्रंथीच्या ऊतींच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता या वयोगटातल्या पुरुषांमध्ये बऱ्यापैकी जास्त असते. ब्रेस्ट कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री, लठ्ठपणा, आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अभाव अशी कारणंही कर्करोग होण्याच्या शक्यतेला हातभार लावू शकतात.

पुरुषांमधल्या ब्रेस्ट कॅन्सरचा प्रतिबंध कसा करायचा?

    सर्व प्रकारची आजारपणं, विकार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली (Healthy Lifestyle) ही महत्त्वाची बाब आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत, लवकर निदान झाल्यास प्राण वाचू शकतात आणि संबंधित रुग्णांचं आरोग्य चांगलं राहू शकतं. तसेच लठ्ठपणामुळेही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो, हे ध्यानात ठेवायला हवे.स्तनाच्या आकारात अनावश्यक वाढ किंवा घट झाल्याचं लक्षात आल्यास त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं सर्वांत आवश्यक असतं.

 

Nutritionist & Dietitian

 Naturopathist

 Dr. Amit Bhorkar

 whats app: 7218332218

English Summary: Yes, men can get breast cancer too Published on: 03 May 2022, 06:55 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters