आजकाल हार्ट अटॅक म्हणजेच हृदय विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हार्ट अटॅक येण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत त्यामध्ये महत्वाचे म्हणजे तुमचा आहार, व्यायाम आणि जीवनशैली या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. निरोगी शरीरासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम खूप गरजेचा आहे.
हार्ट अटॅक म्हणजे नक्की काय:-
आजकाल हार्ट अटॅक चा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या मध्ये तरुण पिढी ते वयोवृध्द यांचा समावेश जास्त आहे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हार्ट अटॅक चा धोका थोडासा कमी आहे. थोडक्यात सांगायचं म्हटल तर हार्ट अटॅक म्हणजे शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होणे आणि रक्ताचा पुरवठा हृदयापर्यंत न होणे यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येतो. डॉक्टरांच्या मते हार्ट अटॅक चा धोका महिला वर्गामध्ये सुद्धा वाढत चालला आहे यामध्ये सामान्यतः 18 ते 55 वयोगटातील स्त्रियांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.
हेही वाचा:-यंदा च्या साली सोयाबीनच्या उत्पादनात ५२ टक्के घटीची शक्यता, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट
हार्ट अटॅक प्रमाण वाढण्याची कारणे:-
1) कॉलेस्ट्रॉल चे अधिक प्रमाण:-
स्त्रियांच्या शरीरामध्ये estrogen नावाचा हार्मोन असतो तो वाढणाऱ्या कॉलेस्ट्रॉलपासून संरक्षण करत असतो. परंतु मेनोपोज नंतर कॉलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढल्यानंतर हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
2) मानसिक तणाव:-
एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करून तणाव घेणे किंवा कामाचा ताण घेणे यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. तसेच मानसिक आजारामुळे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचं धोका संभवतो.
हेही वाचा:-भारतात BMW ची कुपे SUV ची इडिशन लाँच, जाऊन घ्या फीचर्स आणि किंमत
3) छातीत दुखण:-
छातीमध्ये असाह्य वेदना होणे ही हार्ट अटॅक ची सुरुवाती ची लक्षणे आहेत. बऱ्याच वेळा अस्वस्थ वाटू लागते शिवाय हार्ट अटॅक येण्यापूर्वी मान पाठ कंबर दुःखी होण्यास सुरुवात होते.
4) लठ्ठपणा:-
हार्ट अटॅक साठी सर्वात धोकादायक हा लठ्ठपणा आहे आणि शरीरावरील वाढती चरबी, वाढत्या चरबिमुळे शरीराला रक्तपुरवठा योग्य प्रमाणे होत नसल्यामुळे शरीरातील सेल ब्लॉक होतात आणि हार्ट अटॅक येण्याचं धोका जास्त असतो.
Share your comments