दूध हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे आपल्या सगळ्यांना माहितीआहे.आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्यापैकी बरेच जण दुधाचे नियमित सेवन करतात. तसे पाहायला गेले तरगाय, म्हैस आणि शेळी यांच्या दुधाचा वापर जास्त प्रमाणात होतो.
परंतु आहारामध्ये जास्त प्रमाणात गाय आणि म्हशीचे दूध घेतले जाते. परंतु आपण कधी या दृष्टीने विचार करतो का की, आरोग्याच्या दृष्टिकोनातूनगाईचे अथवा म्हशीचे यापैकी कोणते दूध शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे?बरेचदा लोक म्हशीचे दूध जास्त प्रमाणात घेतात. परंतु जर विचार केला तर गाईचे दूधसुद्धा तितक्याच प्रमाणात आरोग्यासाठी फायदेशीर आहे.आपण या लेखामध्ये गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये नेमका फरक काय आहे हे जाणून घेऊ.
गाय आणि म्हशीच्या दुधातील फरक
जर पचनाचा विचार केला तर गाईचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा पचायला हलके आहे. एवढेच नाही तर कमी चरबीयुक्त आहे. गाईचे दूध म्हशीच्या दुधाच्या तुलनेत पटकन पचते त्यामुळेच लहान मुलांना गाईचे दूध पिण्यासाठी दिले जाते.
या तुलनेमध्ये म्हशीच्या दुधाचा विचार केला तर ते मलई युक्त आणि जाड असते.म्हणून त्याचा उपयोग खीर,कुल्फी,दही,चीज आणि तूप तयार करण्यासाठी केला जातो. गाईच्या दुधाचा उपयोग हा रसगुल्ला, रसमलाई तयार करण्यासाठी केला जातो. दूध साठवण्याच्या कालावधीचा विचार केला तर गाईचे दूध एक ते दोन दिवसातच सेवन करणे महत्त्वाचे आहे. परंतु त्या तुलनेत म्हशीचे दूध बरेच दिवस साठवता येते.
दुधातील घटकानुसार फरक
आता आपण गाय आणि म्हशीच्या दुधाचे त्यातील असलेल्या पोषक घटकांच्या आधारावर तुलना बघू. म्हशीच्या दुधाचा विचार केला तर प्रथिने जास्त असतात व चरबी देखील जास्त असते. त्यामुळे दुधातही कॅलरी जास्त असतात.त्या तुलनेमध्ये गाईच्या दुधात पाण्याचे प्रमाण अधिक, घनतेचे प्रमाण कमी आणि 90 टक्के दूध पाण्यापासून बनलेले आहे.
म्हशीच्या दुधाचा विचार केला तरयामध्ये कॅल्शियम,फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. आता पोषक घटकांनुरूप फरक पाहू.
1- चरबी-गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा चरबी कमी असते.यामुळे गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध अधिक जाड असते. गाईच्या दुधात तीन ते चार टक्के चरबी असते तर म्हशीच्या दुधात सात ते आठ टक्के चरबी असते.
2- प्रथिने- म्हशीच्या दुधामध्ये गाईच्या दुधाच्या तुलनेत दहा ते अकरा टक्के जास्त प्रथिने असतात. याच कारणामुळे म्हशीचे दूध लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना प्यायचा सल्ला दिला जात नाही.
3- कॅलरी-म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा कॅलरी जास्त असते.कारण त्यामध्ये प्रथिने,चरबी जास्तअसते.
आपण जर एक कप म्हशीच्या दुधाचा विचार केला तर त्यामध्ये 237 कॅलरी असतात व त्या तुलनेत गायीच्या एक कप दुधात 148 कॅलरी असतात.
4- कोलेस्टेरॉल- म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल कमी असते म्हणूनच हे पीसीओडी,उच्च रक्तदाब व मूत्रपिंडाच्या समस्या आणि लठ्ठपणामुळे पीडित लोकांसाठी चांगली असल्याचे सिद्ध होते.
( टीप- सेवन करणे अगोदर किंवा कुठल्याही वैद्यकीय उपचार करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या)
Share your comments