प्रत्येकाच्या घरी अगदी सहजपणे उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे, मोठ्या व्यक्तींकडून सतत आपल्याला शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत शिवाय शेंगदाणे खाण्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. शेंगदाण्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. तसेच गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांचे बदाम म्हणून शेंगदाणे ओळखले जाते.
थायरॉईडसाठी हानिकारक:-
जर तुम्हाला हायपोथायरॉईड चा त्रास असेल तर शेंगदाणे खाणे टाळावे कारण शेंगदाण्याचे सेवन केल्यामुळे TSH (Thyroid-stimulating hormone) ची पातळी वाढते. ज्यामुळे शरीरातील हायपोथायरॉईडीझम वाढते. यामुळे यापासून त्रास कमी करायचा असेल तर शेंगदाण्याचे सेवन अत्यंत कमी प्रमाणात करावे.
यकृत समस्या वाढवणे:-
शेंगदाण्यामध्ये प्रथिने, कार्ब्स ,फायबर आणि फॅटी ऍसिडचे या घटकांचे प्रमाण जास्त असते शिवाय हे सर्व घटक आपल्या यकृता साठी हानिकारक असतात आणि यकृताचे आरोग्य बिघडवतात यासाठी आहारात शेंगदाण्याचे सेवन कमी प्रमाणात करावे काही. वेळेस शेंगदाण्याचे सेवन केल्यामुळे अपचन सारख्या त्रासाला सामोरे जावे लागते.
हेही वाचा:-शेतकरी बांधवांनी वाढणार डोकेदुखी, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा, वाचा सविस्तर
ऍलर्जी:-
बऱ्याच लोकांना विशिष्ट प्रकारच्या अन्नाची ऍलर्जी असते. अनेकांना शेंगदाण्याची अॅलर्जी असते. ज्या लोकांना शेंगदाण्यांची ऍलर्जी आहे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि त्वचेला खाज सुटते. अशा स्थितीत अॅलर्जी असलेल्यांनी शेंगदाणे खाणे टाळावे.
चरबी वाढते:-
शेंगदाण्याचे सेवन नियमित केल्यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते शिवाय शरीरावर चरबी वाढते कारण शेंगदाण्यामध्ये स्निग्ध पदार्थ असतात जे की आपल्या हृदयासाठी घातक असतात त्यामुळे शेंगदाण्याचे सेवन प्रमाणात करावे. शेंगदाण्याचे अनेक तोटे असेल तरी असंख्य फायदे सुद्धा आहे. म्हणून गरीब लोक शेंगदाण्याचा बदामाची उपमा देतात. शरीरासाठी अत्यंत आवश्यक तसेच रोजच्या आहारात शेंगदाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो परंतु काही व्यक्तींनी शेंगदाण्याचे सेवन प्रमाणात करणे गरजेचे आहे.
Share your comments