आपल्या देशातील बरेच शेतकरी फळ बागांची लागवड करत आहेत कारण यातून कमी कष्ट करून जास्त उत्पन्न मिळते. तसेच आपल्याकडील शेतकरी प्रामुख्याने द्राक्षे, आंबा, पेरू आणि चिक्कू या फळबागांची लागवड करतात. तुम्ही बाजारात लाल पेरू आणि पांढरा पेरू हे पेरूचे दोन प्रकार बघितले असतील परंतु तुम्हाला माहितेय का त्यातील कोणता पेरू तुमच्या आरोग्यास फायदेशीर आहे.
पेरू मध्ये आढळणारे पोषक घटक:-
बाजारात पेरू हे फळ आपल्याला अगदी सहजपणे मिळते. पेरू आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी तसेच फायद्याचा आहे. तसेच पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, लायकोपीन आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्सचं व मॅगनीज मुबलक प्रमाण असते जे की आपल्या शरीराला खूप फायदेशिर असे असते. बाजारात आपण दोन प्रकारचे पेरू बघतो एक म्हणजे पांढरा पेरू आणि दुसरा लाल पेरू.
पेरू खाण्याचे आरोग्यदायी फायदे:-
पेरू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण पेरू चे सेवन केल्यास आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. आणि शरीरातील ग्लुकोज वाढवण्यास मदत करते.
तसेच पेरूमध्ये कॅल्शिअमही खूप आढळतं. जे आआपल्या हाडांना मजबूत बनवतात. तसेच याच्या सेवनाने पचन तंत्रही चांगलं राहतं. त्यासोबतच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी करण्यासाठीही पेरू फायदेशीर ठरतो.
हेही वाचा:-गोंदिया जिल्ह्यात 12 हजार हेक्टरवर धानाचे नुकसान, शेतकरी राजा चिंतेत
आरोग्यासाठी पांढरा पेरू चांगला की लाल?
पांढऱ्या पेरूच्या तुलनेत गुलाबी पेरूमध्ये शुगर आणि स्टार्चचं प्रमाण कमी असतं. गुलाबी पेरूच्या तुलनेत पांढऱ्या पेरूमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटचे गुण अधिक आढळून येतात. परंतु आपल्या शरीरासाठी गुलाबी पेरू हा जास्त चांगला असतो. गुलाबी पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतात. जे की आपल्या आरोग्यासाठी फायदशीर असतात.
त्यासोबतच यात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडही आढळून येतं. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 इम्यूनिटी वाढतात. त्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते. तसेच ज्या लोकांना डायबेटिज आहे त्या लोकांनी हमखास याचे सेवन करावे. तसेच पेरू चे सेवन केल्यामुळे दात मजबूत होतात आणि पचाना संबंधित असलेल्या तक्रारी दूर होतात.
Share your comments