साधारणतः दुग्धोत्पादनासाठी आपल्याकडे गाय आणि म्हशींचा जास्त वापर करण्यात येतो. परंतु गुणात्मक दृष्ट्या विचार केला तर गाय आणि म्हैस यांच्या दुधामध्ये गुणात्मकदृष्ट्या फरक आढळून येतो तो कोणता हे आपण या लेखात पाहू.जर फॅट्स आणि प्रोटीनच्या बाबतीत विचार केला तर गाईच्या दुधाच्या तुलनेत म्हशीच्या दुधामध्ये फॅट्स आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. गायीच्या दुधाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याच्या सेवनाने पचनशक्ती चांगली होते. रात्री शांत झोप येण्यासाठी गाईचे दूध फायदेशीर ठरते. नवजात बालकांचा जर आपण विचार केला तर नवजात बालके फक्त दुधावर सहा महिने अवलंबून असते. कारण दूध हे एक संपूर्ण आहार असल्याचे म्हटले गेले. दुधामध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात त्यामुळे अनेकदा औषध घेताना ते कोमट दूधासोबत घ्यायचा आयुर्वेदिक डॉक्टर सांगत असतात. दुधापासून बनवलेले पदार्थ दररोज आहारात घेतले तर शरीराला पोषण मिळते.
गाईच्या दुधात म्हशीच्या दुधाच्या तुलनेने फॅट्स कमी असतात आणि हेच मुख्य कारण आहे की म्हशीचे दूध घट्ट आणि गायचा दूध पातळ दिसते. तुलनेने गाईच्या दुधामध्ये म्हशीच्या दुधापेक्षा चार टक्क्यांपर्यंत फॅट्स कमी असतात. आकडेवारीचा जर विचार केला तर गायीच्या दुधामध्ये तीन ते चार टक्के फॅट्स असतात तर म्हशीच्या दुधामध्ये सात ते आठ टक्के फॅट्स असतात. त्यामुळेच म्हशीचे दूध पचण्यासाठी जड असते त्या तुलनेने विचार केला तर गाईचे दूध पचनास हलके असते. गाईच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे नवजात बालकांना कुठल्याही कारणाने आईचे दूध मिळत नाही किंवा पिता येत नाही अशा बाळांना गाईचे दूध पाजले जाते. जर आपल्याला वजन वाढवायचे असेल आणि अशक्तपणा असेल तर म्हशीचे दूध प्यावे.
गाईच्या दुधामध्ये पाण्याचा प्रमाण हे जास्त असते त्यामुळे ते पचायला हलके असते. शंभर ग्रॅम गाईच्या दुधात जवळपास ८८ टक्के पाणी असते तर म्हशीच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत असते. जर आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर म्हशीचे दूध पिणे फायद्याचे असते. गाईच्या दुधाच्या तुलनेने म्हशीच्या दुधामध्ये दहा ते अकरा टक्के अधिक प्रोटीन असते. आधीच्या प्रोटीनमुळेच म्हशीचे दूध हे हिट रेझिस्टंट असते आणि त्यामुळेच आजारी, वृद्ध आणि नवजात बालकांना म्हशीचे दूध देऊ नये. म्हशी आणि गाईच्या दुधामधील सगळ्यात महत्त्वाचे अंतर म्हणजे कोलेस्टेरॉलचे प्रमाण. म्हशीच्या दुधामध्ये गाईच्या दुधाच्या तुलनेने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. म्हणून म्हशीचे दूध हाय बीपी, हृदयातील कोलेस्टेरॉल, किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींना आवश्यक प्यावे. म्हशीच्या दुधामध्ये प्रोटीन आणि फॅट्स दोन्ही जास्त असतात. तर गाईच्या दुधात हे दोन्ही कमी असतात. एक कप म्हशीच्या दुधातून आपल्याला २७३ कॅलरीज मिळतात तर एक कप गाईच्या दुधामधून १४८ कॅलरीज मिळतात.
म्हशीचे दूध पाहिल्यानंतर आपल्याला शांत झोप येत नाही. तर गाईचे दूध झोपण्यापूर्वी प्यायलाने आपल्याला चांगली झोप लागते. दुधामध्ये उपलब्ध खनिज द्रव्यांचा विचार केला तर म्हशीच्या दुधामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. तर गाईच्या दुधामध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण कमी असते. म्हणून लहान मुलांना आणि हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांना गाईचे दूध फायदेशीर ठरते. गाईचे दूध पित्तशामक असते आणि पचनक्रिया सुधारते तर म्हशीचे दूध पचायला जड असते. त्यामुळे त्यापासून बनविलेले तूप हे कफ आणि पित्तकारक असत.
माहिती स्त्रोत- स्मार्ट डेअरी- डिजिटल मॅक्झिन
Share your comments