1. आरोग्य सल्ला

मल्टीपल ऑर्गन फेल्युअर म्हणजे काय? जाणून घेऊ या बद्दल सविस्तर माहिती

आज भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदींचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. यावेळी दीदीचा निधनाची पुष्टी करताना डॉ.प्रतीत समदानी यांनी सांगितले की, लतादीदींचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाल्यामुळे म्हणजेच एकापेक्षा अनेक अवयव निकामी झाल्यामुळे निधन झाले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the health

the health

आज भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदींचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. यावेळी दीदीचा निधनाची पुष्टी करताना डॉ.प्रतीत समदानी यांनी सांगितले की, लतादीदींचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाल्यामुळे म्हणजेच एकापेक्षा अनेक अवयव निकामी झाल्यामुळे निधन झाले.

मल्टिपल ऑर्गन फेल्युलर म्हणजे नेमके काय आहे याबद्दल जाणून घेऊया.

मल्टिपल ऑर्गन फेल्यूलर म्हणजे नेमके काय?

 ज्यावेळी शरीरातील एकापेक्षा जास्त अवयव काम करणे थांबवतात तेव्हा या स्थितीला मल्टीपल ऑर्गन फेल्युअर असे म्हणतात.यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील प्रभावित होते. तसेच या स्थितीचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर देखील होतो.

कारणे

 रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे शरीरामध्ये सायटॉकीन्सचे उत्पादन होते. पेशी व इतर शारीरिक कार्याच्या विकासामध्ये सायटॉकीन्स महत्त्वाची भूमिका निभावते. तसेच याद्वारे पेशींना सूचित केले जाते व रोगप्रतिकारक शक्ती कार्यक्षम ठेवली जाते.  तसेच शरीरामध्ये ब्रॅडीकिनीन प्रथीने देखील असतात. दरम्यान या सर्वांचे प्रमाण शरीरामध्ये जास्त झाल्यास अनेक अवयव निकामी होतात. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रभावित होते व  शरीरात जळजळ होत.

एवढेच नाही तर रक्ताच्या गुठळ्या देखील तयार होऊ लागतात.

मल्टिपल ऑर्गन फेल्युअर ची लक्षणे

 तज्ञांच्या मते दिवसभर लघवी न होणे,अंग थरथरणे, श्वासोच्छवासास त्रास होणे,  स्नायूंमध्ये वाढ होणे इत्यादी लक्षणे दिसतात. पुढे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांकडून उपचार करणे महत्वाचे ठरते.

English Summary: what is meaning of multipal organ felulre symptoms and treatment Published on: 06 February 2022, 07:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters