1. आरोग्य सल्ला

हायपरटेन्शन म्हणजे नेमके काय आहे? काय आहेत त्याची लक्षणे आणि कारणे? वाचा सविस्तर

सध्या चे जग हे अतिशय धावपळीचे आणि धकाधकीचे आहे.घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत धावपळ चालू असते. जीवनशैलीमध्ये खूप प्रमाणात बदल झाला आहे. खाण्याच्या सवयी देखील खूप बदलले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
reason of hypertention

reason of hypertention

 सध्या चे जग हे अतिशय धावपळीचे आणिधकाधकीचे आहे.घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत धावपळ चालू असते. जीवनशैलीमध्ये खूप प्रमाणात बदल झाला आहे. खाण्याच्या सवयी देखील खूप बदलले आहेत. 

त्याचा थेट परिणाम हा आपल्या शरीरावर आणि मानसिक स्थितीवर होत असतो. प्रचंड प्रमाणात मानसिक ताण आणि शारीरिक अस्वास्थ्य या समस्या प्रखरतेने जाणवत आहेत. यामधील चे प्रमुख समस्या म्हणजे हायपरटेन्शन ही होय. या लेखात आपण हायपरटेन्शन म्हणजे नेमके काय? त्याची कारणे व लक्षणे समजून घेऊ.

 हायपरटेन्शन म्हणजे नेमके काय?                                                                 

 हायपर टेन्शन ला उच्च रक्तदाब आणि उच्च बीपीचा त्रास असे देखील म्हणतात. यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढतो. हा दाब वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांत रक्त प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी हृदयाला अधिक कार्य करण्याची आवश्यकता असते. जर आपण वैद्यकशास्त्रानुसार पाहिले तर रक्तदाब 130/80mmHg पेक्षा अधिक असला तर व्यक्ती हायपर टेन्शन किंवा उच्च रक्तदाबाच्या श्रेणीत येते. उच्च रक्तदाब हा शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. परंतु याचा थेट विपरीत परिणाम हृदयावर होतो. आता आपण या हायपरटेन्शन काही कारणे समजून घेऊ

कारणे

  • झोपेती अनियमितपणा किंवा झोपेचा अभाव होणे.
  • लठ्ठपणा
  • जास्त प्रमाणात राग करणे
  • आहारामध्ये मांसाहारी पदार्थांची जास्त सेवन करणे.
  • तेलकट पदार्थ तसेच अनारोग्य आहाराचे सेवन करणे.

 हायपरटेन्शन ची सामान्य लक्षणे

1-यामध्ये व्यक्तीला सुरुवातीच्या काळात डोक्याच्या मागील बाजूस आणि मानेत वेदना होऊ शकतात.

2- उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.

3-रक्तदाब  वाढला तर व्यक्तीला अंधुक दिसायला लागते तसेच लघवीवाटे रक्तस्त्राव होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

4-उच्चरक्तदाब झाल्यावर चक्कर येणे, अति प्रमाणात थकवा आणि सुस्तपणा सारख्या लक्षणांची तक्रार येते.

  • बऱ्याच वेळा रात्री झोप न येणे सोबत हृदयाचे ठोके देखील वाढतात.
English Summary: what is a exact meaning of hypertention?and reason and symptoms of hypertention Published on: 11 March 2022, 09:56 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters