अलीकडे चुकीच्या जीवन शैलीमुळे तसेच वातावरणातील बदलामुळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खान-पानामुळे भारतात लठ्ठ व्यक्तींचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लठ्ठपणा अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो, म्हणुन लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य एक्सरसाइज तसेच प्राणायाम आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. मात्र, जर आपले वजन एक्सरसाइज न करता देखील कमी होत असेल तर ही एक धोक्याची घंटी असू शकते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीचे आपोआप वजन कमी होत असेल तर हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. जर आपल्या सोबतही असे घडत असेल तर आपण ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा एखादा कॅन्सरतज्ञचा सल्ला घ्या.
कॅन्सर तज्ञांच्या मते, जर आपणास कुठल्याही प्रकारचा आजार नसेल आणि आपले वजन कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज अथवा डाएट फॉलो करत नसाल तरी देखील आपले वजन झपाट्याने कमी होत असेल, तर हे कॅन्सर समवेतच अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देण्याचे लक्षण असू शकते. अद्यापही देशातील अनेक नागरिक कॅन्सरच्या लक्षणा विषयी अधिक जागृत दिसत नाही. ग्रामीण भागात अशिक्षित लोकांना कॅन्सर विषयी तर नगण्य ज्ञान आहे. दोन वर्षांपूर्वी भारतासमवेतच संपूर्ण जगात कोरोना नामक महाभयंकर आजार आला. तेव्हापासून लोकांमध्ये कॅन्सरच्या लक्षणांबाबत निष्काळजीपणा अधिक दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अनेक लोक लक्षणे दिसूनही रुग्णालयात जाणे टाळतात. असे अनेक कॅन्सर पीडित रुग्ण आहेत जे खूप उशिरा रुग्णालयात पोहोचले आहेत.
अनेक लोकांना अचानक वजन कमी होण्याची समस्या असते तसेच शरीरात कुठल्याही एका भागात गांठची समस्या असते, मात्र असे व्यक्ती धाकापोटी वेळेवर रुग्णालयात जातं नाहीत. परिणामी कॅन्सर लास्ट स्टेजला पोहोचत असतो आणि त्यामुळे कॅन्सर वर नियंत्रण मिळवणे डॉक्टरांच्या आवाक्याबाहेरचे असते. वजन कमी होणे हे केवळ कर्करोगाचे लक्षण नसून एचआयव्ही, टीबी, मधुमेह यांसारख्या आजारांचे लक्षण असल्याचे देखील तज्ञ सांगतात. त्यामुळे वजन आपोआप कमी होत असेल तर वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. देशात कॅन्सर संबंधी अजूनही एवढी जागृकता नसल्याने अनेक लोकांना कॅन्सर ची लक्षणे दिसत असली तरी देखील त्यांना कॅन्सर ची लक्षणे आहेत असे ठाऊक नसते. याशिवाय अनेक लोक कॅन्सर हा रिकव्हर होत नाही या मानसिकतेत जगत आहेत, त्यामुळे लक्षणे कॅन्सरची आहेत असे माहिती असूनही कॅन्सर हा मारूनच टाकतो असा गैरसमज मनाशी बाळगून कधीच रुग्णालय गाठत नाहीत.
कॅन्सर तज्ञांच्या मते, अनेक लोकांना माहितीच्या अभावी लास्ट स्टेज मध्ये कॅन्सर असल्याचे समजते. त्यामुळे जर लोकांनी या छोट्या-छोट्या लक्षणावर बारकाईने लक्ष ठेवले आणि लक्षण दिसताच रुग्णालयाचा दरवाजा गाठला तर कॅन्सरचा उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होते. त्यामुळे कॅन्सरप्रति देशात जागृकता निर्माण करणे अनिवार्य आहे, यासाठी सरकार दरबारी देखील अनेक उपाययोजना राबविल्या जाणे आवश्यक आहेत तसेच सरकार काही योजना राबवित देखील आहे मात्र यात अजून गती आणणे अनिवार्य आहे.
Share your comments