कोरोना काळामध्ये फुफ्फुसांचे आरोग्य सांभाळणे फार महत्त्वाचे आहे. ही चाचणी म्हणजे घरातल्या घरात सहा मिनिटे चालणे. या चाचणीवर आरोग्य विभागाने देखील भर दिला आहे. त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी केले आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास बोलत होते. या चाचणीमुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनचे कमतरता लक्षात येईल. जेणेकरून गरजू रुग्णांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल करणे शक्य, असे डॉक्टर व्यास यांनी सांगितले.
चाचणी कशी करावी?
हे चाचणीत करण्यापूर्वी बोटात ऑक्सी मीटर लावून ऑक्सीजन पातळीची नोंद करावी. त्यानंतर ऑक्स मीटर तसेच बोट ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे.चालताना पायर्यांवर चालू नये याची दक्षता घ्यावी. चालताना चा वेगळा जास्तजलद ही नको आणि जास्त हळू ही असायला नको म्हणजे मध्यम स्पीडने चालावे. सहा मिनिटे बरोबर चालल्यानंतर ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. जर सहा मिनिटे चालू नही ऑक्सिजनची पातळी कमी झाली नाही तर तब्येत उत्तम समजावे. किंवा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशी चाचणी करावी. त्यामुळे काही बदल होतो काही लक्षात येते.
या चाचणीचे निष्कर्ष
जर सहा मिनिटे चालणे झाल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा कमी होत असेल आणि चालणे सुरू करण्यापूर्वी चे पातळी होती त्या पेक्षा तीन टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा चालताना दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सीजन अपुरा पडत आहे असे समजून रुग्णाला दाखल करा. ज्यांना बसल्या जागीच धाप व दम लागतो त्यांनी चाचणी करू नये. ज्या व्यक्तीचे वय 60 वर्षांहून अधिक आहेत ती व्यक्ती सहा मिनिटं ऐवजी तीन मिनिटे चालून ही चाचणी करू शकता.
चाचणी कोणी करावी
ताप, सर्दी,खोकला अथवा कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्ती तसेच होम आयसोलेशन मध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकता.
Share your comments