आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड नावाचा घातक पदार्थ सापडतो जो की हा घातक पदार्थ स्वतः शरीर तयार करत नाही तर आपण जे अन्न खातो त्यामध्ये जे प्युरीन तत्व आहे त्या पदार्थद्वारे शरीरामध्ये हा घातक पदार्थ आपल्या शरीरामध्ये सापडतो. आपण जे काही खातो त्या खाल्लेल्या पदार्थामध्ये प्युरीन चे जास्त प्रमाण असते जे की या खाल्लेल्या पदार्थामुळे आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड च प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. आपले शरीर मूत्रपिंड तसेच लघविद्वारे युरिक ऍसिड फिल्टर करत असते. मात्र काही वेळा हे एवढया प्रमाणावर साचते की जे आपल्या सांध्यांमध्ये जाऊन जमा होते. तर काहीवेळा आपल्या रक्तामध्ये त्याचे प्रमाण वाढते. युरिक ऍसिड ची सामान्यतः पातळी ही 6.8 mg/dL पेक्षा कमी प्रमाणत आहे.
१. ओमेगा ३ फॅट्स :-
सी फूड तसेच आक्रोड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणात असते जे आपल्या शरीरातील एक निरोगी आहाराचा भाग आहे. मात्र काही असे पण सी फूड आहेत ज्या सी फूड मध्ये प्युरीन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ज्या लोकांना संधिवात चा त्रास आहे अशा लोकांनी पूर्णपणे मासे बंद करण्याची गरज नाही मात्र तुम्ही शेलफिश, सार्डिन आणि अँकोव्हीजचे प्रमाण कमी देणे गरजचे आहे कारण या सी फूड मध्ये सर्वात जास्त प्युरीन चे प्रमाण असते.
२. व्हिटामीन सी :-
तज्ञांच्या अनुसार व्हिटॅमिन सी हे युरिक ऍसिड ची पातळी कमी करू शकते जे की लिंबूवर्गीय फळे व व्हिटॅमिन सी असणारी जी इतर फळे आहेत ही संधिवात असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात ठेवावी. तर काही तज्ञ असे सूचित करत आहेत की चेरी खाल्याने संधी रोगाचा जो त्रास आहे तो कमी होतो.
हेही वाचा:-जाणून घ्या, अन्न तंत्रज्ञान उद्योगात करिअरच्या वाढत्या संधी, करू शकता जबरदस्त करियर.
३. प्लांट बेस्ड फूड :-
आपल्या दैनंदिन आहारामध्ये वनस्पती आधारित ज्या भाज्या आहेत या पदार्थाचा समावेश करणे गरजेचे आहे. जे की आपल्या आहारात फळे, भाज्या तसेच शेंगा असणे गरजेचे आहे तसेच या व्यतिरिक्त तुम्ही धान्याचा देखील समावेश असणे गरजेचे आहे.
४. लीन प्रोटीन :-
ज्या पदार्थामुळे आपणास जास्त चरबी सुटते अशा पदार्थांचे सेवन तुम्ही कमी प्रमाणात करावे. अर्थातच कमी सॅच्युरेटेड फॅटचे तुम्ही आपल्या आहारात सेवन करणे गरजेचे आहे. जे की या पदार्थांव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आहारात शेंगा,पनीर, भाज्या, सोयाबीन या पदार्थांचा समावेश करावा.
Share your comments