तुळस म्हणजे 'वनस्पती लहान पण गुण महान असे आहे. तुळशीची पाने ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पाने उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पाने आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो.
याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणा-या असतात. म्हणून त्या उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्तदोष) म्हणजे, जळजळ, पायांची आग, तोंड येणे, नाकातून रक्त येणे, रक्ती मूळव्याध, इत्यादींकरता घेतात. ह्या बिया दूध, किंवा तुपाबरोबर घ्याव्यात. 20 ते 30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्या आणि एका वेळी घ्याव्यात. असे दिवसातून तीन चार वेळा करावे.
सर्दी आणि तापाकरता तुळशीचा रस काढणे -
एक कप तुळशीची पाने पाच मिनिटे पाण्यात भिजवावी. मग ती वाटून कापडातून गाळावी. याचा 20 मि.ली. म्हणजे साधारण अर्धा कप, इतका रस काढावा.
इतका रस होण्याकरता जितकी लागतील तितकी पाने घ्यावी. हा मोठया माणसांकरता एक वेळचा डोस आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यावा. सर्दी आणि तापाकरता ह्याचा उपयोग होतो.
लेखक - मनोहर पाटील
प्रतिनिधी गोपाल उगले
Share your comments