मित्रांनो आपण हिवाळ्यात थंडी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन करत असतो. मात्र यामुळे आपल्या शरीराला अनेक अपायकारक समस्येला सामोरे जावे लागते. म्हणून आपण हिवाळ्यात चहा अथवा कॉफी पिण्याऐवजी टोमॅटो सूप सेवन करू शकता.
टोमॅटो सूप आपणास थंडी पासून बचाव करतो, तसेच यामुळे रोगप्रतिकारक क्षमता देखील कमालीची वाढते. हिवाळ्यात सायंकाळच्या वेळी चहाचे सेवन टाळून आपण टोमॅटो सुपचे सेवन करावे असा सल्ला आहार तज्ञ देत असतात. हिवाळ्यात जर आपणास सर्दी खोकला झाला असेल तर आपण अवश्य टोमॅटो सूप पिला पाहिजे. यामुळे सर्दी खोकला देखील जातो तसेच आपला गळादेखील यामुळे साफ होतो. हिवाळ्यात दिवसातून एकदा टोमॅटो सुपचे सेवन केल्यास सर्दी खोकला पासून दुर राहिले जाऊ शकते. तसेच यामुळे आपले शरीर ताकत्वर बनते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया टोमॅटो सूप कसा बनवायचा.
टोमॅटो सूप बनवण्यासाठी आवश्यक सामग्री (Ingredients needed to make tomato soup)
टोमॅटो सूप बनवण्यासाठी 4 टोमॅटो,1/2 टीस्पून काळी मिरी पावडर, 1/2 टीस्पून साखर, 1 टेस्पून बटर, 4ते5 ब्रेडचे तुकडे, चवीनुसार मीठ एवढी सामग्री आवश्यक असते.
कसे बनवणार टोमॅटो सूप (How to make tomato soup)
टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो व्यवस्थित धुऊन घ्यावे आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करुन घ्यावे. त्यानंतर एका स्वच्छ भांड्यात दोन कप पाणी टाकून त्यात बारीक केलेले टोमॅटो टाकावे व गॅस वरती कमी फ्लोमध्ये शिजू द्यावे. टोमॅटो संपूर्ण शिजेपर्यंत चांगले उकळू द्यावे. जेव्हा टोमॅटो पूर्ण शिजवून जातील तेव्हा गॅस बंद करावा.
शिजलेले टोमॅटो थंड पाण्यात टाकून त्यानंतर टोमॅटोचे साल काढून घ्यावी. त्यानंतर टोमॅटो मिक्सर मध्ये टाकून चांगली बारीक पेस्ट बनवून घ्यावी. त्यानंतर टोमॅटोच्य बिया वेगळ्या करून घ्याव्यात. जर टोमॅटो पेस्ट जास्त घट्ट असेल तर त्यात पाणी मिक्स करावे आणि पुनश्च एकदा गॅस वरती शिजवण्यासाठी ठेवावे. सहा ते सात मिनिटानंतर गॅस परत बंद करावा. एवढे केल्यानंतर आपले टोमॅटो सूप रेडी होते. आपण यात गावरान तूप, काळी मिरी तसेच स्वादानुसार मीठ घालू शकता.
Share your comments