Tomato Update : फळे शरीरासाठी चांगली मानली जातात. त्यामुळे अनेकजण आहारात फळाचा समावेश करतात. हिवाळ्यात टोमॅटो खाणे शरीरासाठी उत्तम मानले जाते. यामुळे हिवाळ्यात अनेकजण आहारात टोमॅटोचा समावेश करतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हिवाळ्यात हे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हिवाळ्यात कच्चे टोमॅटो खाल्ल्यास तुमचे शरीर हायड्रेट राहते. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात मल्टीन्यूट्रिएंट्स मिळतात.
हृदयासाठी फायदेशीर आहे
हिवाळ्यात टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे आहेत. टोमॅटोमध्ये लाइकोपीन भरपूर प्रमाणात असते. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट हृदयरोगासाठी खूप चांगले असतात. यामुळे हृदयविकाराचा धोका १४ टक्क्यांनी कमी होतो. हे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करते. तसेच शरीरातील एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते. यामुळे मानवाला हृदयविकाराचा धोका कमी होतो.
मधुमेहामध्ये फायदेशीर
तसंच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांनी रोज आहारात १ कच्चे टोमॅटो खावे. टोमॅटोमध्ये आढळणारे लाइकोपीन इन्सुलिन पेशी सुधारते. हे पेशींचे तुटण्यापासून संरक्षण करते. त्यामुळे शरीरातील सूजही कमी होते. टोमॅटो तुमच्या शरीरातील फायबर मेटाबॉलिक रेट वाढवतो आणि मधुमेह देखील कमी करतो.
टोमॅटो रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
टोमॅटोच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यात बीटा-कॅरोटीन देखील असते जे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करते. एका संशोधनानुसार टोमॅटोमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. यामुळे आहारात अनेकांकडून टोमॅटोचा सहभाग केला जातो.
Share your comments