डायबेटीस म्हणजेच मधुमेह हा आजार तीस वर्षे वयाच्या पुढे व्यक्तींना देखील सध्या होऊ लागला आहे. आपले दैनंदिन जीवनशैली आणि आहार या दोन गोष्टी डायबिटीससाठी कारणीभूत आहेत. आपल्याला माहित आहेच कि,डायबिटीस ग्रस्त व्यक्ती आहाराच्या बाबतीत खूप प्रकारची पथ्य पाळत असतात. परंतु बऱ्याचदा काही चुकीच्या गोष्टींमुळे मधुमेह नियंत्रणात राहत नाही. परंतु यामध्ये प्री डायबेटिक रुग्णांनी अजिबात घाबरून जाता कामा नये. काही छोट्या गोष्टी डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी ठरतात.
नक्की वाचा:शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल करा कमी, दैनंदिन आहारात करा या पदार्थांचा समावेश
डायबेटिस रुग्ण अशा पद्धतीने करू शकतात शुगर नियंत्रित
जर आपण याबाबतीत आयसीएमआरचा विचार केला तर त्यांच्यानुसार, ज्या व्यक्तींना प्री डायबेटिक आहे अशांनी भात आणि चपाती चे सेवन कमी करावे आणि प्रथिनयुक्त आहाराचे प्रमाण वाढवावे.
या गोष्टीमुळे तुमचे औषधे देखील सुटण्यास मदत होईल. तज्ञांच्या मते, आहारात चपाती आणि भाताचा समावेश कमी केला तर टाईप 2डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते.
आहारात कुठल्या गोष्टींचा करावा समावेश
ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे अशा रुग्णाने बटाटे आणि स्टार्च असलेले इतर भाज्यांचे सेवन करणे टाळावे. तुम्ही आहारामध्ये पत्ता कोबी किंवा फुलकोबीचा वापर तसेच हिरव्या पालेभाज्यांचा वापर करू शकतात.
तुमच्या ताटात थोडेसे चिकन किंवा सोया सारखे प्रथिनयुक्त अन्नपदार्थ असतील तर खूप महत्त्वाचे आहे. तसेच डायबिटीज असलेल्या रुग्णांनी अंड्याचे सेवन देखील करावे.
नक्की वाचा:Health Tips : सकाळी नाश्त्याला एक अंडे खाल्ल्याने मिळतात हे फायदे
थोडा एक्सरसाइज
डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही थोडेसे कष्ट केले तर खूप गरजेचे आहे. म्हणजेच दररोज सकाळी तुम्ही पायी चालून डायबिटीस नियंत्रणात आणू शकतात. जेवणानंतर पाच ते दहा मिनिटे चालल्यास मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो.
जेवण केल्यानंतर हे करा
जेवण केल्यानंतर लगेच बसू नका कारण आहारात असलेल्या कार्बोहायड्रेट मुळे शरीरामध्ये जी काही ऊर्जा निर्माण होते तिचा व्यवस्थित उपयोग होत नाही व अचानक शुगरचे प्रमाण वाढते.
म्हणून जेवणानंतर लगेच बसण्याऐवजी काही वेळ पायी चालण्यास किंवा हलकासा व्यायाम केला तर शरीर ग्लुकोजचा वापर करायला सुरुवात करते व शरीरातील ग्लुकोज नियंत्रणात राहते.
( टीप- वरील माहितीही सामान्य माहितीवर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. यासाठी वैयक्तिक आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. यासंबंधी अधिक माहितीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
नक्की वाचा:Health Tips : बडीशेप खाऊ नका! बडीशेप पाणी प्या, 'या' आजारावर आराम मिळवा
Share your comments