शेंगदाणे आपल्या स्वयंपाक घरात नेहमीच बघायला मिळतो. अनेक लोकांना बाहेर फिरायला जाताना तसेच रात्री झोपताना व जेवताना शेंगदाणे खाण्याची सवय असते. शेंगदाणामध्ये असलेले पोषक घटक मानवी आरोग्याला विशेष फायदेशीर असल्याने याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. शेंगदाण्याचं मॅग्नेशियम फॉलेट यांसारखे खनिज देखील मोठ्या प्रमाणात आढळतात, हे खनिज मानवी आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळवून देतात. अनेक लोकांना कच्चे शेंगदाणे तसेच भाजलेले व उकडलेले शेंगदाणे खाने आवडतात.
यामध्ये असणारे पोषक घटक मानवी आरोग्य सुदृढ बनवते. मात्र, असे असले तरी यामुळे अनेक लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका देखील असतो. काही लोकांना शेंगदाण्याचे अतिसेवन मोठे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे आज आपण कोणत्या लोकांनी शेंगदाण्याचे सेवन कमी करावे किंवा करूच नये याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया शेंगदाण्याचे साईड इफेक्ट.
लिव्हर चे आजार असलेल्या लोकांनी चुकूनही करू नये शेंगदाण्याचे सेवन- असे सांगितले जाते की, शेंगदाण्यांमध्ये असलेले पोषक गुणधर्म मानवी आरोग्याला नानाविध प्रकारचे फायदे मिळवून देतात. मात्र असे असले तरी ज्या लोकांना लिव्हर संबंधी काही विकार असतील अशा लोकांनी शेंगदाण्याचे सेवन टाळावे किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अगदी कमी प्रमाणात शेंगदाण्याचे सेवन करावे. शेंगदाण्यांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे मानवी लिव्हरवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे ज्या लोकांना लिव्हर चे आजार असतात त्यांना याचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी टाळावे शेंगदाण्याचे सेवन- ज्या लोकांना ओबेसिटी अर्थात लठ्ठपणा असतो किंवा ज्या व्यक्तींचे प्रमाणापेक्षा अधिक असते अशा लोकांनी शेंगदाण्याचे सेवन टाळावे. आपल्या आहारात अशा लोकांनी शेंगदाण्याचा समावेश करू नये असा सल्ला दिला जातो, याचे प्रमुख कारण म्हणजे शेंगदाण्यांमध्ये असलेले कॅलरीज वजन वाढवण्यास मदत करतात त्यामुळे ज्या व्यक्तींचे आधीच अधिक वचन आहे अशा लोकांनी याचे सेवन करणे टाळावे नाहीतर वजनात अजून वाढ होऊ शकते.
हृदयाचे विकार असलेल्या लोकांनी टाळावे शेंगदाण्याचे सेवन- मिठाचा वापर करून उकडलेले किंवा भाजलेले शेंगदाणे अनेक लोक मोठ्या चवीने खात असतात. असे शेंगदाणे बाजारात देखील सहज मिळतात किंवा लोक घरी तयार करून सेवन करत असतात. परंतु ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशर किंवा अन्य हृदयाचे विकार असतील अशा लोकांनी खारट शेंगदाण्याचे सेवन करू नये नाहीतर यामुळे हृदयाचे विकार वाढण्याची शक्यता असते.
Disclaimer : सदर लेखात सांगितलेली विधी, पध्दती आणि दाव्यांचं Krishi Jagran Marathi कुठलंही समर्थन करत नाही. लेखात सांगितलेली माहिती केवळ एक प्राथमिक सल्ला आहे. अशा पध्दतीचा कोणताही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा निदान एकदा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.
Share your comments