जगात मोठ्या प्रमाणात लोक पपईचे सेवन करतात, देशात बारामाही पपईचे फळ उपलब्ध असल्याने अनेक लोक मोठ्या आवडीने याचे सेवन करत असतात. पपई खाण्यासाठी खूपच चविष्ट असल्याने तसेच यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळत असल्याने याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. पपई मध्ये अनेक मायक्रोन्यूट्रिएंट आढळतात जे की मानवी शरीरासाठी खूपच पोषक असतात त्यामुळे अनेक आहार तज्ञ पपई खाण्याचा सल्ला देत असतात. पपईमध्ये भरपूर ऊर्जा, फॅट, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जस्त, मॅंगनीज, तांबे, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, बी, सी, बी6, ई, फोलेट, थायामिन, बीटा कॅरोटीन, नियासिन यांसारखे इत्यादी पोषक घटक आढळतात. त्यामुळे पपईच्या सेवनाने मानवी शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढते तसेच पपई वजन कमी करण्यासाठी देखील कारगर सिद्ध होत असल्याचे सांगितले जाते.
पपईचे सेवन केल्याने मानवी पाचन तंत्र खूपच मजबूत बनते, यामुळे पोटासंबंधित अनेक विकार दूर होण्यास मदत होते. पपई मुळे हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस यांसारख्या गंभीर आजारांपासून वाचले जाऊ शकते. पपई मुळे मानवी शरीराला जरी मोठ्या प्रमाणात फायदा पोहोचत असला तरी यामुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. असे काही रोग आहेत, ज्या रोगात पपईचे सेवन केल्यास मानवी शरीराला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे आज आपण कोणत्या लोकांनी पपईचे सेवन करू नये याविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या लोकांनी टाळावे पपईचे सेवन
»गर्भवती महिलांनी पपईचे सेवन टाळावे. यामध्ये लेटेक, पॅपेन नावाचा घटक मोठ्या प्रमाणात आढळतो. हे दोन्ही घटक गर्भाशयाला संकुचित करू शकतो, त्यामुळे गर्भवती महिलांनी पपईचे सेवन पूर्णतः टाळावे.
»ज्यांना किडनीचे आजार, यकृताची समस्या, त्वचेशी संबंधित कोणताही आजार, हायपोथायरॉईडीझम, कोणत्याही प्रकारची ऍलर्जी, किडनी स्टोन आहे त्यांनीही पपईच सेवन टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी प्रमाणात पपईचे सेवन करावे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि त्यात असलेले अँटीऑक्सिडंट किडनी स्टोनची समस्या वाढवू शकतात.
»पपईमध्ये फायबर आणि लॅक्सेटिव्हचे प्रमाण जास्त असल्याने जुलाब आणि सूज असल्यास पपई खाणे टाळावे असा सल्ला दिला जातो.
»पपईमध्ये असलेले फिनोलिक संयुगे (बीटा कॅरोटीन) देखील काही दुष्परिणामांना कारणीभूत ठरू शकतात. ज्या लोकांचे हृदयाचे ठोके अनियमित असतात त्यांनी पपई खाऊ नये.
»जर तुम्हाला हायपोग्लायसेमिया म्हणजेच लो ब्लड शुगरची समस्या असेल तर पपई खाणे बंद करा, कारण यामध्ये अँटी-हायपोग्लायसेमिक किंवा ग्लुकोज-कमी करणारे घटक असतात, ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी आणखी कमी होऊ शकते.
»मात्र मधुमेह असेल आणि रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर मात्र आपण पपई खाऊ शब्दात मात्र यासाठी डॉक्टरांचा एकदा अवश्य सल्ला घ्या.
Share your comments