मुळव्याध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बर्याच जणांना हा त्रास असतो. हे दुखणं म्हणजे खूपच वेदनादायी असून कधीकधी रुग्णाला यामुळे वेदना तर होतातच परंतु रक्त देखील पडते. यामध्ये बद्धकोष्ठतेमुळे गुद्दारात सूज व वेदना होतात. मुळव्याधापासून मुक्तता मिळवण्यासाठी बरेच जण अनेक प्रकारच्या उपाययोजना करतात.
परंतु हवा तेवढा फरक यामध्ये जाणवत नाही.आहारात देखील खूपच पथ्य यामुळे पाळावे लागतात. या लेखामध्ये आपण काही सोप्या पदार्थांचा आहारात वापर करून मुळव्याध पासून कसा बचाव करू शकतो याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:Health Tips : वारंवार उचकी येते का? मग हे घरगुती उपाय करा, उचकी होणार गायब
आहारात करा या पदार्थांचा समावेश
1- गाईच्या तुपाचा वापर- पोटाशी किंवा पचनाची संबंधित ज्या काही समस्या आहेत यावर गाईचे तूप खूप लाभदायी आहे. तुम्ही जर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा गाईचे तूप कोमट पाण्यात घेतले तर बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
2- नाशपाती- नाशपाती आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असून यामध्ये फायबर व इतर महत्वाचे संयुगे असतात. त्यामुळे मूळव्याधीची लक्षणे कमी होतात. यामध्ये फ्रुक्टोज असल्यामुळे ते नैसर्गिक रेचक असून हे फळ त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.
3- सफरचंदाचा वापर- सफरचंद या फळांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते व यामधील अघुलनशील तंतू पचनामध्ये तुटत नाहीत व मल मोकळा करण्यास तसेच आतड्यांची हालचाल सुधारण्यास खूप प्रकारे मदत करते. यामुळे सफरचंदा सारखी इतर फायबरयुक्त पदार्थ देखील मुळव्याध सारखे आजारापासून वाचण्यासाठी मदत करतात.
नक्की वाचा:डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोलसाठी 'या' फळाचे सेवन करावे; ठरेल फायद्याचे..
4- आवळा आणि मेथी- पोटाशी संबंधित कुठलीही समस्या असेल तर त्यामध्ये मेथीचे दाणे खूप लाभदायी ठरतात. त्यासाठी रात्रभर एक चमचा मेथीचे दाणे भिजवून ठेवले व सकाळी अनशापोटीसेवन केल्याने खूप फायदा मिळतो
त्या सोबतच पचनाशी संबंधित समस्यांमध्ये आवळा देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. आवळा किंवा आवळा चूर्ण जर खाल्ले तर त्याचा बद्धकोष्ठ ते मध्ये खूप मोठा फायदा मिळतो.
5- काळे मनुके-शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे मुळव्याध होतो त्यामुळे काळे मनुके खूप फायदेशीर ठरतात. यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते त्यामुळे फायदा होतो. काळे मनुके भिजवून खाणे खूप महत्त्वाचे असते.
( टीप- वरील माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठलाही उपचार करण्याअगोदर किंवा आहारात बदल करणे अगोदर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
Share your comments