शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आणि पोषक घटकांची नितांत आवश्यकता असते. विविध अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकांची पूर्तता केली जाते. आपल्याला माहित आहेच की, बऱ्याच व्यक्ती शाकाहारी तर काही मांसाहारी असतात. यामध्ये शाकाहारी व्यक्तींच्या आहारामध्ये हिरव्या भाजीपाला आणि कडधान्य यांचे प्रमाण जास्त असते.
जर आपण हिरव्या भाजीपालाचा विचार केला तर यांच्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वांचे प्रमाण योग्य असते. परंतु पावसाळ्यामध्ये देखील पर्यंत पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त असते हे देखील तेवढेच सत्य आहे.
परंतु पोषक घटकांसाठी मांसाहार हाच खावा असे नसून तुम्ही शाकाहारी आहाराच्या माध्यमातून देखील निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असलेले घटक मिळवू शकतात. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
नक्की वाचा:Health Tips: दररोज खजूर खाल्ल्याने शरीराला मिळतात अनेक फायदे,शरीर राहते तंदुरुस्त
हे अन्नपदार्थ म्हणजे पोषक घटकांची खाण
1- हिरवे वाटाणे- आता हिवाळ्याची सुरुवात होत आहे व यामध्ये तुम्ही जर हिरव्या वाटण्याची भाजी खाल्ली तर शरीरासाठी ते उपयुक्त आहे व हिवाळ्यात हिरवे वाटाणे मुबलक प्रमाणात बाजारात मिळतात.
जर आपण एक विचार केला तर एक कपभर वाटाण्या मध्ये नऊ ग्रॅम प्रोटीन असतात व ए, के आणि सी जीवनसत्व आणि वाट आणि समृद्ध आहेत. एवढेच नाही तर यामध्ये उच्च प्रमाणात फायबर देखील असते.
2-राजमा-राजमा देखील शरीरासाठी खूप उपयुक्त असून यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. तुम्हाला 1/2 कप राजमाच्या माध्यमातून साडेसात ग्राम प्रोटीन मिळतात.
3- विविध प्रकारच्या डाळी- आपण आहारामध्ये विविध प्रकारच्या डाळी यांचा समावेश करतो. यामध्ये तूर, मूग आणि उडीद डाळी चा समावेश मोठ्या प्रमाणावर केला जातो. या डाळींचे सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक असलेले प्रथिने, खनिजे आणि फायबर शरीराला मिळते.
नक्की वाचा:चांगल्या आरोग्यासाठी तुळशीच्या बिया उत्तम; अनेक आजारांपासून करतात बचाव, जाणून घ्या...
4- चणे- जर आपण चण्याचा विचार केला तर यामध्ये प्रथिने, कॅल्शियम तसेच आयर्न मोठ्या प्रमाणात असते. आपल्या दैनंदिन गरजेच्या 40 टक्के फायबर, 70 टक्के फोलेट आणि 22 टक्के आयर्नची गरज चण्याच्या माध्यमातून पूर्ण होते.
चन्यामध्ये असलेल्या ग्लायसेमिक इंडेक्स असतो. म्हणजेच तुमचे शरीर चणे एकदम हळूहळू पचवते. त्यामुळे जास्त काळापर्यंत पोट भरलेले वाटते तसेच रक्तातील शुगरची पातळी देखील नियंत्रण राहते.
5- मक्याचे कणीस- जर आपण मक्याचा विचार केला तर यामध्ये फॅट आणि कोलेस्टेरॉल नसते. जर आपण काही अभ्यासाचा विचार केला तर प्रत्येक 100 ग्रॅम मक्यामध्ये 3.3 ग्रॅम प्रोटीन असते व ते स्नायू तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते.
Share your comments