चांगल्या आरोग्यासाठी आहार व्यवस्थापन जितके गरजेचे आहे तेवढे आपल्या दैनंदिन काम करत असताना काही छोट्या बाबी पाळणे देखील तितकेच महत्वाचे आहे. बऱ्याचदा काही गोष्टी छोट्या छोट्या असतात परंतु त्याचा होणारा परिणाम हा खूप चांगला असतो. त्यामुळे अशा छोट्या बाबींकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते.
जर आपण आपल्या दैनंदिन कामांमधून वेळ काढून किंवा दिवसभरातल्या रुटीनमधून काही महत्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे. जेणेकरून आरोग्य चांगले राहते व मन देखील ताजेतवाने राहते. अशाच काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण या लेखातून जाणून घेऊया.
नक्की वाचा:Health Tips: भावांनो! मनावर खूप ताणतणाव आहे तर करा 'हे' उपाय, मिळेल सुटका तणावापासून
चांगल्या आरोग्यासाठी छोट्या गोष्टी परंतु आहेत महत्त्वाच्या
1- झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर न करता थोडेसे संगीत ऐका- आपल्यापैकी बऱ्याच जणांना रात्री झोपताना मोबाईल पाहून झोपण्याची सवय असते.यामुळे डोळे,मान तसेच खांदे व पाठ इत्यादींच्या मांसपेशीवर ताण निर्माण करण्याचे काम मोबाईल करतो.
त्यामुळे नियमितपणे झोप येण्यासाठी समस्या निर्माण होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी 45 मिनिटे मोबाईल साईडला ठेवून जर तुम्ही आवडीचे गाणे ऐकले तर मज्जासंस्था शांत होते. तसेच श्वास व हृदयाचे ठोके देखील स्थिर होतात.
2- काम करत असताना थोडेफार चालत राहा व दोन तास उभे राहून काम करण्याचा प्रयत्न करा- कारण बऱ्याच जणांचा बैठे काम असते त्यामुळे बहुतांशी दिवसाचा वेळ हा बसून जातो.
यामुळे स्थूलपणा तसेच हृदयरोग व टाइप 2 मधुमेहाचा धोका संभवतो. त्यामुळे दिवसभरात दोन तास उभे राहणे किंवा कामादरम्यान थोडेफार चालले तर इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी सुधारते व हृदयरोग व मधुमेहाचा धोका कमी होतो.
नक्की वाचा:सावधान! तुमच्या 'या' एका सवयीमुळे जीवाला होऊ शकतो धोखा; वेळीच घ्या काळजी
3- जेवण करताना ही काळजी घ्या- बऱ्याच जणांना टीव्ही किंवा मोबाईल पाहत असताना जेवण करण्याची सवय असते, त्यामुळे अनेकदा गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते किंवा अन्न नीट चावून खाल्ले जात नाही.
त्यामुळे वजन वाढण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अन्न खात असताना ते पाण्यासारखे मुलायम होईपर्यंत चावून खाल्ले पाहिजे व पाणी देखील हळूहळू पिले पाहिजे. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते.
4- शुगर ड्रिंक करा कमी त्याऐवजी सुप घ्या- बऱ्याच जणांना साखर असलेली पेये पिण्याची सवय असते. त्यामुळे शरीराचे वजन वाढते. लहान मुलांमध्ये वजन वाढीचे प्रामुख्याने हेच कारण आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे ब्लड प्रेशर तसेच हार्टअटॅक सारखे आजारांचा धोका संभवतो. जर तुम्हाला अशी ड्रिंक घ्यायची सवय असेल तर ते हळूहळू कमी करून तुम्ही त्याऐवजी सूप घेऊ शकता. त्यामुळे होणारा मधुमेहाचा धोका 25 टक्क्यांनी कमी होतो.
( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषीजागरण समूह सहमत असेलच असे नाही. आहारात कुठलाही बदल करताना किंवा कुठलाही उपचार करण्याअगोदर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
नक्की वाचा:तुमच्या शरीरात युरिक ऍसिड वाढतेय, हे ४ पदार्थ खावा आणि आणि या समस्येपासून करा सुटका
Share your comments