डोके दुखणे ही समस्या आपण बरेच जण सामान्य समजतो.डोके दुखणे मागे बरीच कारणे असतात.परंतु डोकेदुखीमुळे होणाऱ्या वेदना या असाह्यअसतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना नेहमी नेहमी डोकेदुखीचा त्रास असतो.
त्यामुळे असे लोक त्यांची दैनंदिन कामे देखील व्यवस्थितरित्या करू शकत नाहीत. या लेखामध्ये आपण काही घरच्या घरी करता येणारे उपाय समजून घेऊ जेणेकरून डोकेदुखी वर याचा चांगला फायदा होईल.
डोकेदुखी वर घरच्या घरी करता येणारे रामबाण उपाय
- भरपूर पाणी पिणे- बऱ्याचदा असे होते की शरीरामधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे डीहायड्रेशन होते व त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने डोके दुखायला लागते त्या वेळी भरपूर पाणी प्यावे. भरपूर पाणी पिल्याने सुद्धा डोकेदुखीवर मात करता येऊ शकते.
- लवंग- लवंग हे डोके दुखी वरील एक उत्तम उपाय आहे. तव्यावर काही लवंग शेकून घेतल्यानंतर त्यात गरम असतानाच रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचा वास घेत राहावा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होतो.
- ॲक्युप्रेशर- हाताचा अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्नायू वर एक मिनिटापर्यंत दाब दिला तर स्नायू वर दाब दिल्यामुळे डोकेदुखी पासून सुटका होते.
- लिंबू पाणी-शरीरामधील आम्लांचे प्रमाण जरकमी झाले तर त्यामुळे सुद्धा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोकं दुखायला लागले तर लिंबू पाणी प्यावे. लिंबू पाणी तयार करताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ आणि खाण्याचा सोडा घालने कधीही उत्तम असते.
- कलिंगड- पाणीदार फळे खाणे हा डोकेदुखी वरील चांगला उपाय आहे. पाणीदार फळांमध्ये आपण खरबूज, कलिंगड आणि द्राक्ष यांचा समावेश करु शकता. यामध्ये जर कलिंगडाचा विचार केला तर यामध्ये नैसर्गिकरीत्या पाण्याचा साठा मुबलक असतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी झाले असेल तर कलींगडा मुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची पातळी स्थिर होण्यास मदत होते.
- स्ट्रेच करणे- बराच वेळा स्नायूंवर किंवा नसांवर ताण आला तर डोक्यात दुखायला होते. यात काही वेळा पाठीचा वरचा भाग,मान,खांद्यांवर ताण पडल्याने डोकं दुखायला लागते. अशावेळी मानेचे स्ट्रेचिंग करून पहावे. यामध्ये मान डावीकडून उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरीरातील अनेक स्नायूंची हालचाल होऊनते थोडे मोकळे होतात.
- दीर्घ श्वास घेऊन सोडणे-ऑक्सिजनची कमतरता हे देखील डोकेदुखीचे एक कारण ठरू शकते.त्यामुळे जर डोके दुखायला लागले तर भरपूर झाडे असलेल्या एखाद्या भागात जाऊन फिरून यावेव फिरताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा.यामुळे डोकेदुखी नक्कीच कमी होते.
- बर्फाचा शेक घेणे- डोक्या मधील नसांना बर्याचदा सूज येते व त्यामुळे देखील डोके दुखते. यासाठी कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते.
- आले टाकून चहा पिणे- आले टाकून केलेला चहा चवीला देखील चांगला असतो आणि आरोग्यासाठी देखील फायद्याचा असतो. आले टाकून चहा घेतल्याने शरीरामधील रक्तवाहिन्यांमध्ये जी सूज असते ती कमी होण्यास मदत होते व वेदना कमी होतात.(स्त्रोत-लोकसत्ता)
Share your comments