किडनी म्हटले म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे.किडनीच्या आजारांना सायलेंट किलर डिसीज असे म्हटले जाते. कारण किडनीचे आजार हे फार उशिरा समजतात.
आपल्याला माहिती आहेत की जर किडनी फेल झाली तर आयुष्यभर डायलिसिस असा सल्ला दिला जातो किंवा किडनी ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय उरतो. आपल्या रोजच्या सवयीचा परिणाम आपल्या किडनीवर होतो. याचे नेमके होते अशी की किडनी हळूहळू खराब व्हायला लागते परंतु याची लक्षणे लगेच दिसून येत नसल्याने लवकर समजत नाहीत. म्हणून या लेखामध्ये आपण अशी कुठली कारणे आहेत की त्यामुळे किडनी खराब होऊ शकते. हे जाणून घे.
किडनी खराब होण्याचे प्रामुख्याने महत्त्वाचे कारणे……..
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण-टाईप 2 चा डायबिटीज असलेल्या रुग्णांना किडनीचा आजार होण्याची शक्यता जास्त असते. डायबिटीस च्या अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरात इन्शुलिन कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढ होते. याचा परिणाम किडनीवर व्हायला लागतो. किडनीला अधिक प्रमाणात रक्त फिल्टर करावे लागते.
- त्यामुळे किडनी मध्ये ज्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्यांचे कार्य मंदावते व विषारी द्रव्य पूर्णपणे काढून टाकण्यास त्या असमर्थ ठरतात. त्यामुळे शरीरामध्ये अधिक प्रमाणात पाणी व मीठ तयार होते आणि प्रोटिन्स लघवीवाटे बाहेर टाकले जातात. किडनी खराब झाल्याचे लक्षण आहे. यामुळे किडनी निकामी होऊ शकते.
- रक्तदाबात होणारा बदल- जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशर आणि डायबिटीस असेल तर तुमच्या किडनीचे आरोग्य धोक्यात आहे. हाय ब्लड प्रेशर मुळे किडनी जवळील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व कमकुवत होतात.त्यामुळे किडनीला कार्य करण्यासाठी पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. रक्त पुरवठा कमी झाल्याने ऑक्सिजन व पौष्टिक घटकांचा पुरवठा देखील कमी होतो. त्यामुळे नेफ्रॉन्स खराब होतात व किडनी विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचा असमर्थ होते.एक महत्त्वाचे कारण आहे.
- प्रोटीन्सचे अधिक सेवन- काही अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, जर आहारात अधिक प्रोटीन सेवन केले तर कालांतराने किडनीचे आजार होतात.यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे प्रोटीन मेटाबोलिजम झाल्यानंतर ब्लड यूरिया नायट्रोजन नावाचा टाकाऊ पदार्थ तयार होतो तो गाळून वेगळा करण्याचे कार्य किडनीचे असते. हा ब्लड युरिया किडनीचे टाकाऊ पदार्थ गाळण्याच्या यंत्रने मध्ये बिघाड करतोआणि हा झालेला बिघाड पुन्हा भरुन काढता येत नाही म्हणून प्रोटीन घेण्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे.
- पेन-किलर्स अर्थात वेदनाशामक औषधे घेणे- पेन किलर्स जास्त प्रमाणात घेतले तर त्याचा परिणाम किडनीवर होतो. कारण ही औषधे किडनी कडून उत्सर्जित झाल्यावर त्याचे विघटन करण्याचे कार्य यकृताचे असते. त्यानंतर ते पचन नलिकेमध्ये सोडले जातात.
- जास्त प्रमाणात वेदनाशामक औषधे घेतल्याने किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो त्यामुळे अगदी आवश्यक असेल तेव्हाच औषधे घ्यावीत. पेन-किलर्स घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.
- संसर्गामुळे काही आजार झाले तर- इन्फेक्शन मुळे होणाऱ्या आजारांचे स्वरूप अगदी सौम्य पासून गंभीर होत जाते. व्हायरल इन्फेक्शन मुळे मलेरिया, डेंगू अशा आजारांमध्ये किडनीवर परिणाम होऊ शकतो. तसेच अंतर्गत रक्तस्राव किंवा शरीरात तयार होणारे टॉक्सिन ची निर्मिती यामुळे नेफ्रोटॉक्सिनची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सुद्धा किडनीवर परिणाम होऊ शकतो.
Share your comments