कांद्याचा वापर हा दररोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात केला जातो. कुठल्याही प्रकारच्या स्वयंपाकाच्या पदार्थात कांद्याचा वापर होतो. कांदा हा आरोग्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कांद्यामुळे जेवणाची चव वाढते.
कांद्याचे वेगवेगळे आरोग्याला फायदे असून कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी देखील कांद्याचे सेवन चांगले मानले जाते. परंतु त्यातल्या त्यात भाजलेल्या कांद्याचे आरोग्यदायी फायदे खूपच आहेत. या लेखामध्ये आपण भाजलेल्या कांद्याचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊ.
भाजलेल्या कांद्याचे आरोग्यदायी फायदे
कांद्याचे आरोग्यदायी फायदे तर भरपूर आहेत परंतु कांदा जर भाजून खाल्ला तर त्याचे फायदे अधिक मिळतात.त्यातील पहिला फायदा म्हणजे..
नक्की वाचा:निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी 'हे' पदार्थ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा व सकाळी खा !
1- हाडे मजबुतीसाठी उपयोगी-भाजलेल्या कांद्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी मदत होते. त्यामुळे हाडे मजबूत होतातच परंतु दात देखील मजबूत होतात.
2- विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत- आजकाल बरेच लोक मिरची,बटाटा तसेच सिंगापूर चाऊमीन आणि इतर बरेच फास्ट फूड लोक खातात. त्यामुळे शरीरामध्ये बऱ्याच प्रकारचे विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. ते विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकण्याचे महत्त्वाचे काम भाजलेल्या कांद्याच्या मदतीने होते.
नक्की वाचा:Health Point: दूध प्या परंतु बसून की उभे राहून? जाणून घ्या या बाबतीत तज्ञांचे नेमके मत
3- शरीरावरील सूज कमी करण्यासाठी उपयोग- शरीरातील सूज कमी करण्यासाठी तुम्ही भाजलेल्या कांद्याचा आहारात समावेश करू शकतात.
यामध्ये असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मजळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी प्रभावी आहे.परंतु त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे.
4- पचनसंस्थेसाठी उपयोगी- पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी शरीरात फायबरचे प्रमाण चांगले असणे गरजेचे असते.जर तुम्हाला फायबर ची कमतरता जाणवत असेल तर भाजलेले कांदा खा. फायबरच्या पुरवठ्यामुळे बद्धकोष्टता आणि अपचन सारख्या समस्या तुम्हाला त्रास देत नाहीत.
नक्की वाचा:निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी 'हे' पदार्थ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा व सकाळी खा !
Share your comments