जीवन सगळेजण जगतात. परंतु दीर्घायुषी जगणे एक वेगळी गोष्ट असते. आपल्याला एक आपल्या आजूबाजूच्या निरीक्षणावरून एक समजते की, जे आता 70 किंवा ऐंशीच्यावयात आहेत असेआजी आजोबा यांना आजही बऱ्याच जणांना चांगल्यापैकी दिसते किंवा काहींचे अजूनही दात पडलेले नसतात.हळूहळू का होईना काहीतरी काम तरी करीत असतात.
परंतुआत्ताचे जनरेशन पाहिले तर अगदी दहा ते पंधरा वर्षाच्या वयामध्ये डोळ्यांना चष्मा लागतो. मेहनतीचे काम होत नाही. तेव्हा आपण म्हणतो की अगोदरच्या लोकांचे जेवण किंवा आहार गावरान होता. परंतु आता सगळा हायब्रिड जमाना आलाअसे बरेच जण सहजपणे म्हणुन जातात.परंतु यामागे काहीतरी तथ्य आहेहेही तितकेच खरे. हाताचे जनरेशन शंभरी पार करणे जवळ जवळ अशक्यच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जर दीर्घकाळ जगता आले तर आणि कसे? याचे उत्तर काही तज्ञांनी दिले असून त्यांच्यामध्ये शंभर वर्ष जगणे शक्य आहे फक्त तुम्हाला तुमचे जेवण चांगले घ्यावे लागेल.
या बाबतीतले संशोधन
यूनिवर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनचे प्रा. रोजलीन अँडरसन आणि यूएससी लिओनार्ड डेव्हिड स्कूलचे प्रा. वॉल्टर लोन्गो यांनी गेल्या दशकात पोषणावर झालेल्या शेकडो संशोधनांचा अभ्यास केला व त्यांचा हा निष्कर्ष अलीकडेच प्रकाशित झाला आहे.
दीर्घकाळ जगता येऊ शकते असे जेवण किंवा आहार संशोधकांनी शोधला आहे. त्यांच्या मते वनस्पती आधारित कार्बोहायड्रेट असलेले जेवण वाढवून आणि प्रोसेस्ड फूड कमी करून दीर्घकाळ जगता येऊ शकते. अँडरसन यांच्या मते उपवास आणि इतर जेवणाचा संबंध वजन कमी करण्याशी जोडला जातो.पण ते दीर्घायुष्यासाठी हे महत्त्वाचे आहे. यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधकांनी दीर्घायुष्यासाठी डार्क चॉकलेट देखील महत्वाचे मानले आहे. त्यांच्या मते रोज तुमची 30% कॅलरी काजू, ऑलिव्ह तेल आणि डार्क चॉकलेट यातून यायला हवी. पुढे ते असा देखील सल्ला देतात की लाल मांस आणि प्रक्रियायुक्त मांसासह रिफाइंड धान्य आणि ॲडेड शुगर टाळणे उत्तम. तसेच प्रक्रियायुक्त अन्ना ऐवजी वनस्पती आधारित जेवण केल्याने आयुष्याचे दहा वर्षे वाढतात. प्रोटीनचे सेवन मर्यादित केल्याने आयुष्य वाढू शकते. अनेक प्रकारचे प्रोटीन आणि अमिनो ऍसिड मुळे हार्मोनचे प्रमाण वाढते आणि शरीराची जैविक प्रक्रिया वेगवान होते. त्यामुळे शरीर लवकर जर्जर होते.
संशोधक आधून मधून तसेच एकापेक्षा जास्त दिवस उपवासाचा सल्ला देखील देतात. त्यांच्या मते रोज अकरा ते बारा तासांच्या अंतराने खाणे आणि उर्वरित 12 तास उपवास करणे चांगले असते. दर तीन ते चार महिने एकापेक्षा जास्त दिवस उपवास करणे फायदेशीर ठरते.(स्रोत-दिव्य मराठी)
महत्वाच्या बातम्या
Share your comments