कानात दुखणे ही समस्या फार सहज आणि सोपी वाटते परंतु इतकी सोपी नाही. कानात जर दुखायला लागले तर कुठल्याही कामामध्ये लक्ष तर लागतच नाही परंतु वरून त्रास होतो तो वेगळाच. तसे पाहायला गेले तर कान दुखण्याचे खूप वेगवेगळे कारणे आहेत. कानामध्ये इन्फेक्शन किंवा जळजळ किंवा एखादी घाण इत्यादीमुळे देखील कानात वेदना होऊ शकतात. ते लेखामध्ये आपण कानदुखी वर काही सोपे घरगुती उपायांची माहिती घेऊ ज्यामुळे कान दुखीवर आराम मिळू शकतो.
नक्की वाचा:Health Tips : दुधात तूप टाकून प्या! 'हे' गंभीर आजार दूर होतील
कानदुखीवर घरगुती उपाय
1- तुळशीची पाने- तुळस ही वनस्पती आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असून आयुर्वेदामध्ये तुळसला खूप महत्त्व आहे. तुळशीच्या पानांमध्ये एंटीऑक्सीडेंट,
अँटीइनफ्लेमेंटरी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात त्यामुळे तुळशीच्या वापराने कानाचे दुखणे सोबतच कानाचे इन्फेक्शन देखील दूर होते. यासाठी तुळशीची पाने बारीक करून त्याचा रस गाळून घ्यावा व कानात एक ते दोन थेंब टाका.
2-ओलीव्ह ऑइल- ऑलिव्ह ऑइल कानात कोमट करून टाकल्यास आराम मिळतो फक्त कानात ऑलिव ऑइलचे दोन थेंब टाकावे.
नक्की वाचा:Corona Vaccine: कोरोना रोखण्यासाठी चीनने आखला बिग प्लॅन; आता..
3- कांद्याचा रस- कांद्याचा रस देखील कान दुखीवर रामबाण उपाय असून एक चमचा कांद्याचा रस गरम करून कोमट झाल्यावर दोन ते तीन थेंब कानात टाकल्यावर आराम मिळू शकतो.
4- लसूण- लसुनमध्ये अँटी इनफ्लेमेन्ट्री गुणधर्म असतात त्यामुळे कानामध्ये लसणाची एक छोटी पाकळी किंवा लवंग ठेवणे हा वेदना कमी करण्यासाठीचा एक चांगला उपाय आहे. यामुळे कानाचे दुखणे तर कमी होतेच परंतु जळजळ देखील कमी होते.
5- आईस पॅक- कानाच्या दुखण्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आईस पॅक किंवा उबदार कॉम्प्रेसचा वापर करता येऊ शकतो. ही पद्धत मुळातच मुलं आणि प्रौढांसाठी चांगली आहे. दुखणाऱ्या कानावर दहा मिनिटांसाठी बर्फाचा पॅक ठेवू शकतात. यामुळे देखील आराम मिळतो.
नक्की वाचा:Health Tips : बडीशेप खाऊ नका! बडीशेप पाणी प्या, 'या' आजारावर आराम मिळवा
( वरील उपाय हे सामान्य माहितीवर आधारित असून कुठल्याही उपचार करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Share your comments