आपल्यापैकी बऱ्याच जणांना आंबट ढेकर येण्याची समस्या असते. हे प्रामुख्याने अन्न नीट पचत नाही त्यामुळे होऊ शकते. तसेच आहारामध्ये मसालेदार पदार्थांचा समावेश तसेच कोल्ड्रिंक्स, दारूचे व्यसन, धूम्रपान इत्यादी गोष्टींमुळे देखील आंबट ढेकर येतात. यामुळे छातीत जळजळते, उलट्या होणे तसेच पोट फुगण्याचे समस्या उद्भवते. या लेखामध्ये आपण आंबट ढेकर दूर करण्यासाठीच्या काही घरगुती उपाय पाहू.
आंबट ढेकर येण्याच्या समस्यावर घरगुती उपाय
1-हिंग- जर पोटात गॅस झाला असेल, आंबट ढेकर येत असेल तर यासाठी हींगाचा वापर लाभकारक ठरू शकतो. यासाठी हिंग पाण्यात मिसळून पिल्याने आंबट ढेकर येणे पासून मुक्तता मिळते.
2- मेथी- यासाठी मेथी जर तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली व हे पाणी सकाळी रिकाम्यापोटी केले तर आंबट ढेकर येणे बंद होते.
3- वेलची- आंबट ढेकर येत असतील तर वेलची खाल्लीत तर आंबट ढेकर येणे बंद होते.
नक्की वाचा:सावधान! ॲसिडिटीचा सतत त्रास होतोय? तर हृदयविकाराची असू शकतात लक्षणे...
4- बडीशेप आणि साखर- बऱ्याच जणांना रात्री जेवण केल्यानंतर आंबट ढेकर येण्याची समस्या उद्भवते. यासाठी तुम्ही बडीशेप सोबत साखर खाऊ शकता. यामध्ये बडीशोप पचनसंस्था सुधारते व पोटात गॅस देखील होत नाही व साखरेमुळे पोटाला थंडावा मिळतो.
6- दही- बऱ्याच जणांना दुपारच्या वेळेस आंबट डर येण्याची समस्या येते. यासाठी गोड दही घेणे उत्तम ठरते. यामुळे पोट थंड होईल आणि आंबट ढेकर येण्याचे समस्येपासून आराम मिळतो.
नक्की वाचा:या वयोगटातील महिलांना असतो सर्वात जास्त हार्ट अटॅक चा धोका, जाणून घ्या लक्षणे
Share your comments