कोरडा खोकल्याची समस्या हल्ली बऱ्याच जणांना आहे. या समस्येचे सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा अनेक दिवस राहतो किंवा फक्त झोपल्यानंतर येत राहतो. झोपल्यानंतर जर आला तर रात्रभर झोप लागली मुश्कील होते.
तसेच दिवसा यायला लागला तर कामे करताना देखिल अडथळे येतात. त्यावर आपण अनेक प्रकारचे खोकल्यावरचे औषध येतो परंतु आराम पडेलच याची काही शाश्वती नसते. कोरडा खोकला येण्याची प्रमुख कारणे जर पाहिले तर यामध्ये प्रदूषण, फ्लू यासारख्या घटकांचा विचार करता येईल. बऱ्याचदा कोणत्याही प्रकारच्या औषधांचा फरक यावर पडत नाही त्यामुळे काही आयुर्वेदिक घरगुती उपचार करून बघू शकता. त्यामुळे आपण काही कोरडा खोकला वरील घरगुती औषधी उपाय बघू.
कोरडा खोकला वरील घरगुती उपाय
1- आल आणि मीठ- कोरडा खोकलाने त्रस्त असाल तर आल्याचे छोटे-छोटे तुकडे करून घ्यावेत व त्यावर चिमूटभर मीठ घालावे. दातांनी हे तुकडे चावावेत. त्यामुळे आल्याचा रस घशात येतो. नाहीतर दातांखाली आल्याचे तुकडे पाच ते आठ मिनिटे धरून ठेवावेत.
2- आलं आणि मध- आलं आणि मध दोन्ही पदार्थ कोरड्या खोकल्यावर खूप रामबाण आहे. मध आणि आल्याच्या रसात जेष्ठमध पावडर मिसळून जर सेवन केले तर कोरडा खोकला बरा होतो. हे तीनही पदार्थ शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे आहेत. एक चमचा मधात आल्याचा रस घालून प्यावा. तसेच घसा सतत कोरडा पडत असल्यास ज्येष्ठमधाची छोटीशी काडी तोंडात ठेवून चावी त्यामुळे घसा खवखवणे, कोरडा खोकला आणि घसा दुखी त्रास देखील कमी होतात.
3- काळी मिरी आणि मध- मधात काळी मिरी पावडर मिसळावी. हे मिश्रण चाटावे त्यामुळे कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते. यासाठी चार ते पाच काळी मिरी वाटून त्याची पावडर करावी व यामध्ये मध मिसळावे.
4- गरम पाणी आणि मध- कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने घशाला आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी मध मिश्रित कोमट पाणी प्यायल्यामुळे कोरडा खोकला बरा होतो.
(टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केले आहे. या माहितीशी व्यक्तिगत रित्या आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठलेही पदार्थ सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:कृषी आणि जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी ३ कोटी; 'या' जिल्ह्याला मिळाला मान
नक्की वाचा:उपमुख्यमंत्री साहेब पानी दया ! शेतकऱ्यांचे अजित पवार यांना निवेदन
नक्की वाचा:अचानक लागलेल्या आगीत कडबा गंज जमीनदोस्त; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
Share your comments