सर्दी आणि खोकला या दोन्ही आरोग्याच्या समस्या या पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त प्रमाणात उद्भवतात. सर्दी झाली तर आपल्या दैनंदिन कामावर देखील याचा विपरीत परिणाम होतो. सर्दी खोकल्याचा परिणाम घशावर देखील होतो कधी कधी घशामध्ये एलर्जी देखील होते. कुठल्याही गोष्टीत किंवा कामात लक्ष लागत नाही.
वरून कुठले औषध घेतले तर त्याचा ताबडतोब फरक पडेल असे देखील होत नाही. त्यामुळे या लेखामध्ये आपण काही घरगुती छोटेसे उपाय जाणून घेऊ.
नक्की वाचा:Health Update: धुळीची ऍलर्जी आहे का? करा हे घरगुती उपाय,मिळेल आराम
सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
1-मध- मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. यामुळे घसा दुखी किंवा खोकला आणि सर्दी पासून त्वरित आराम मिळण्यास मदत होते. आपल्याला माहित आहेस की, सर्दी खोकला मध्ये घसा खवखवतो. यावर देखील मधामुळे आराम मिळतो.
2- कोमट पाणी- जर सर्दी खोकला झाल्यावर सतत कोमट पाणी पिले तर त्याविरूद्ध लढण्यासाठी मदत होते.कोमट पाणी प्यायल्यामुळे गळ्याच्या सभोवती जी काही सूज असते ती देखील कमी होते.
यामुळे घसा खवखवणे आणि संसर्गापासून देखील आराम मिळतो. जर तुम्ही कोमट पाणी पिले तर सर्दी खोकल्याचा संसर्ग हळूहळू कमी होण्यास मदत होते.
नक्की वाचा:Health Tips: अचानक कान दुखू लागल्यास करा 'हे'घरगुती उपाय,मिळू शकतो आराम
3-आले- सर्दी खोकला झाल्यावर आल्याचा चहा पिणे खूप फायद्याचे ठरते. जर तुम्ही सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिला तर नाकातून पाणी येणे आणि नाक बंद होणे यापासून खूप आराम मिळतो.
4- हळद- आपल्याला माहित आहेच कि हळदीमध्ये अँटीसेप्टीक आणि अँटिबायोटिक घटक असल्यामुळे सर्दी मुळे होणारी जळजळ आणि वेदना त्यामुळे कमी होतात.
हळद हे घशासाठी देखील फायदेशीर असून हळदी दूध पिल्यामुळे घशाला बऱ्यापैकी आराम मिळतो. झोपण्याच्या आधी जर तुम्ही एक ग्लास गरम दुधात हळद टाकून पिले तर सर्दी आणि खोकला बरा होतो.
नक्की वाचा:Health Tips : दुधात तूप टाकून प्या! 'हे' गंभीर आजार दूर होतील
Share your comments